BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या


 शिराळा : येथील औद्योगिक वसाहत तसेच भटवाडी, करमाळे आदी गावामध्ये झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. 

वादळी पावसात विविध कंपन्यांचे पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे, नवीन बांधकाम जमीनदोस्त होणे आदी प्रकार घडले आहेत. कांही नागरिकांना, महिलांना छताचे उडालेले पत्रे लागून गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत औद्योगिक वसाहती मधील कंपनी मालकांशी चर्चा केली. भटवाडी व करमाळे येथील घरांचे पत्रे उडून गेले आहेत. प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. याबाबतही गावकऱ्यांशी चर्चा करून परिस्तिथीचा आढावा घेतला. तालुक्यातील उत्तर भागातील अनेक गावांना या ढगफुटी सदृश वादळी पावसाचा शेती, घरांना, रानातील वस्त्यांना मोठा फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावेत, अशी सूचना तहसीलदारांना दिली आहे. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते





तात्काळ पंचनामे करून तातडीने भरपाई द्या - शिवाजीराव नाईक


      शिराळा एमआयडीसी, भटवाडी, करमाळे, पाचुंब्री, घागरेवाडी, शिरशी यासह ज्या ठिकाणी वादळी पावसात नुकसान झाले आहे त्या अपादग्रस्तांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी. त्याकरिता स्थानिक महसूल कर्मचारी यांनी तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव तयार करावेत. असे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.

        


शिराळा : शिराळा औद्योगिक वसाहतसह, भटवाडी, करमाळे, पाचुंब्री,पणुब्रे तर्फे शिराळा,  घागरेवाडी, शिरशी, धामवडे, गिरजवडे  यासह ज्या ठिकाणी वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. या  नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी. तसेच महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेला प्रस्ताव शासनाकडे पाठवा. असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख  यांनी सांगितले.



शिराळा: तालुक्यातील उत्तर भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. यात औद्योगिक वसाहत मधील अनेक उद्योगांना फटाका बसला आहे. उत्तर भागातील घरांची पडझड झाली आहे. या सगळ्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून घ्यावेत. जेणेकरून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी सुलभता येईल असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
  
       

Post a Comment

0 Comments