शिराळा, ता.१२:आप्पांनी राजकारणापेक्षा समाजकरणला जास्त महत्व दिले.त्यांचा हा सामाजिक वारसा जोपासण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड रुग्णनांना पोषक आहार वाटप करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहत असल्याचे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती कै. यशवंत साळुंखे यांचे नातू राहुल साळुंखे यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आय.टी. आय कॉलेज व उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून निगडी( ता.शिराळा) येथील माजी सभापती यशवंत खेत्री साळुंखे(आप्पा) यांच्या पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आलेल्या आहार वाटप प्रसंगी बोलत होते.यावेळी डॉ.सुवर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रतीक साळुंखे, डॉ.सुवर्णा पाटील, नेत्र चिकित्सक अधिकारी सविता नलवडे, सुनील आपटे,जीवन रणदिवे, अमोल रसाळ,अमर खांडेकर, शशिकांत कांबळे, दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.
शिराळा: शिराळा तालुक्यातील २५,शाहूवाडी तालुक्यातील १,अशा एकूण २६,गावात ८३ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,आंबेवाडी,अंत्री बुद्रुक,चिखली,काळूखेवाडी,कोंडाईवाडी,मानेवाडी,मांगरूळ,मोहरे,नाठवडे,पावलेवाडी,तडवळे,शाहूवाडी तालुक्यातील खेड,प्रत्येकी १,भाटशिरगाव,बिऊर,चिखलवाडी,कांदे,कोकरूड,प्रत्येकी २,शेडगेवाडी,टाकवे,प्रत्येकी ३,सागाव,शिराळा,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी ५,पाडळी ८,फकिरवाडी ९,कणदूर १०,मांगले १३,असे एकूण ८३ रुग्ण सापडले आहेत.
0 Comments