शिराळा, ता.१८:आनंदाच्या क्षणापेक्षा अडचणीच्या काळात होणारी मदत ही लाखमोलाची असते. हीच सामाजिक बांधिलकी पत्रकर म्हणून आम्ही जोपासण्याचा कायम प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पत्रकार अजित महजन यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकर अजित महाजन यांनी पुतण्या यश महाजन यांच्या लग्नसमारंभ निमित्ताने कोविड रुग्णांना आहार वाटप केले.
यावेळी डॉ. अजित पाटील, नेत्र चिकित्सक अधिकारी बी.के.पाटील ,चंद्रकांत शिंदे,अमोल पवार, दिनेश हसबनीस,विठ्ठल नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विकास शहा उपस्थित होते.
शिराळा: शिराळा तालुक्यातील २६ गावातील ५४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक,औंढी,बिऊर,धामवडे, धसवाडी,कांदे,कणदूर,खेड,नाटोली,रांजणवाडी, रिळे, सोनवडे,विरवाडी, प्रत्येकी १ ,चिखली, कोकरूड, मणदूर, मानकरवाडी, मोहरे,शिरशी,प्रत्येकी २,चिखलवाडी,नाठवडे, सागाव,वाकुर्डे बुद्रुक, प्रत्येकी ३,भाटशिरगाव ४,शिराळा ५,मांगले ८,असे एकूण ५४ रुग्ण सापडले आहेत.
0 Comments