शिराळा:महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झालेले. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिराळा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा - इस्लामपूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- ओबीसी समाजाचे आरक्षण हे या सरकारच्या असंवेदनशीलता त्यामुळे गेलेले आहे. सरकारला न्यायालयात आपली बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही, परिणामी ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. हे आरक्षण रद्द झाल्यामुळे या समाजाचे प्रचंड मोठे नुकसान झालेली आहे. या समाजाला न्याय देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण देखील या सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेतल्यामुळे न्यायालयामध्ये रद्दबादल ठरलेले आहे. सरकार आरक्षणाबाबत दुजाभाव करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. सरकारने ठाम भूमिका घेऊन हे दोन्हीही आरक्षणे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सत्यजित देशमुख यांनी केली.
यावेळी शिवाजीराव नाईक म्हणाले:- ओबीसी समाजा चे आरक्षण भाजप सरकारने मिळवून दिले होते. त्याचबरोबर मराठा आरक्षण देखील भाजप सरकारने दिले. परंतु दोन्ही आरक्षणाचा विषय महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर रद्द झाला, या सरकारचा नाकर्तेपणा असून हे सरकार जनतेच्या नजरेतून पूर्णपणे फेल गेलेले आहे. त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय या आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही. मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राज्यामध्ये भाजपा कार्यकर्ते स्वस्त बसणार नाहीत. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप राज्य सरकारला जेरीस आणेल.
यावेळी विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजीतसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव पाटील, रघुनाथ पाटील, नगरसेवक वैभव गायकवाड, संभाजी नलवडे, पांडुरंग गायकवाड, आनंदराव पाटील, सचिन यादव, धनाजी नरुटे, उत्तम गावडे, संग्राम पवार, सुनील गुरव, विजय कुंभवडे, प्रदीप कदम, गोरख पाटील, नारायण खोत, अमर खोत, नामदेव पाटील, बबलू शेळके, किरण गायकवाड, शंकर नाकील, जावेद काझी, संतोष गायकवाड, अशोक पाटील, अंकुश नागरे, देवेंद्र पाटील, शशिकांत पाटील,केशव जाधव, तानाजी पाटील, रणजित कदम,आदीसह कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments