BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कलाकारांचे दुःख व व्यथा हा कलाकारच जाणतो म्हणून देव करो पुन्हा अशा मदतीचा योग नको-अभिनेते विजय पटवर्धन

शिराळा, ता.९: कलाकारांचे दुःख व व्यथा हा कलाकारच जाणू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात  अडचणीत असणाऱ्या आपल्या बांधवांना फुल ना फुलची पाकळी मिळावी यासाठी आम्ही फक्त मध्यम म्हणून काम केले.मात्र देव करो अशी मदत करण्याची वेळ पुनः कोणावर येऊ नये असे प्रतिपादन फु बाई फु फेम विजय पटवर्धन यांनी केले.
मांगले( ता.शिराळा) येथे विजय पटवर्धन ,राजू बावडेकर यांच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील कलाकारांना भेटवस्तू वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन होते. अभिनेते राजू बावडेकर व लेखक-दिग्दर्शक वैजनाथ चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अभिनेते राजू बावडेकर म्हणाले,ग्रामीण भागातील कलाकारांच्या यातना व व्यथा मी जवळून अनुभवल्या आहेत.या भागात वैजनाथ चौगुले यांच्यामुळे अनेक वेळा चित्रीकरणाच्यानिमित्ताने येण्याचा योग आला. या तालुक्यात चांगले कलाकार आहेत.त्यांना चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न वैजनाथ करत आहेत. या अडचणीच्या काळात आमच्या कलाकार बांधवांना मदत करण्याचा आग्रह त्यांनी धरल्याने हा किट वाटण्याचा आम्हाला योग आला. आम्ही आमच्यापरीने कलाकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.
नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन म्हणाले, कलाकाराने वयोवृद्ध कलाकार मंडळींना अडचणीच्या काळात मदत करून त्यांच्या आता पर्यंतच्या कलेच्या उपासनेचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे. मदत काय आहे. या पेक्षा अडचणीच्या काळात कोणत्या भावनेतून केली हे महत्वाचे आहे. दुसऱ्यांचे मनोरंज करणार कलाकार आतून किती दुःखी असतो हे फक्त कलाकारचं जाणून घेऊ शकतो. त्यामुळे ही मिळालेली मदत लाख मोलाची आहे.
यावेळी युवा उद्योजक विजय पाटील,शिराळा तालुका कलाकार संघटनेचे अध्यक्ष अनंत सपकाळ, भीमराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी कलाकारांना अभिनेते विजय पटवर्धन, अभिनेते  राजूबावडेकर ,नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात  कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या कठीण काळात त्यांना थोडाफार मदतीचा हात मिळावा म्हणून वैजनाथ चौगुले यांनी प्रयत्न करून ही मदत मिळवून दिली.
स्वागत व प्रास्तविक विजय पाटील यांनी केले.
नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन,  मंडल अधिकारी राजेंद्र खैरे, सुनील कानडे, आर.डी.माने ,स्वप्नील देसाई, अवधूत सुतार,वैभव बेंद्रे, अभिजित कुंभार, अक्षय कुंभार, साक्षी पाटील, ऋषिकेश कुंभार, आशिष उपलाने, सुमित तडाखे उपस्थित होते. या सामाजिक कार्यासाठी साई समर्थ हा हॉल महादेव पाटील यांनी विनामूल्य देऊन कलाकार बांधवांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण केली. आभार वैजनाथ चौगुले यांनी मानले.


Post a Comment

0 Comments