BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन २० पदांना मंजुरी-आमदार मानसिंगराव नाईक


 शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा उप जिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २० पदांना तर मतदार संघातील वाटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ पदांना मंजुरी दिली आहे. शिराळा उप जिल्हा रुग्णालयात पूर्वीची व नवीन मिळून येथील पदांची संख्या आता ४५ होणार आहे. ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. 

ते म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना मिळाव्यात अशी माझी धारणा होती. म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करून ५० खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयास १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी मिळवली. पुढे त्याच्या उभारणीसाठी १४ कोटी ७९ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून अतिशय उपयुक्त व सुसज्ज अशी उप जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी राहिली. त्याचे उदघाटन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील साहेब व राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना. राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२० उदघाटन झाले. यावेळी येथे पूर्ण क्षमतेने स्टाफची भरती करावी अशी मागणी केली होती. पुढे मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आणि भरती प्रक्रिया थांबली होती. परंतु या काळात पूर्वीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या उपलब्ध स्टाफने कोरोना काळात चांगले योगदान दिले. उपलब्ध स्टाफची कसरत मी पाहत होतो. त्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून पदांची मंजुरी मिळवली आहे. त्याबाबत शासन निर्णय झाला आहे. 

ते म्हणाले, काल ता. ७ जून २०१२१ रोजी अवर सचिव रोशनी दिनेश कदम-पाटील यांनी प्रसिध्द केलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) - १, वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण शास्त्रज्ञ) - १, वैद्यकीय अधिकारी (भिषक) - १,  वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) १, अधिसेविका -१ परिसेविका - २,  वरिष्ठ लिपिक - १, अशी ८ पदे भरावयाची आहेत.  वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र) १, हे पद पूर्वी भरलेल्या पदापैकी रूपांतरित करून घ्यायचे आहे. तसेच बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या पदे : अधिपरिचारिका ५, औषध निर्माण अधिकारी २,  बाह्यरुग्ण सेवक १,  शस्त्रक्रीया गृह परिचर १,  शिपाई १,  व्रणोपचारक १, कक्षसेवक १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत. जुनी व नवीन मंजूर पदे मिळून ४५ स्टाफ होणार आहे.

आमदार नाईक म्हणाले, मतदार संघातील वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ पदांना मंजुर झाली आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी -२, आरोग्य सहाय्यक -१, आरोग्य सहाय्यक स्त्री -१, सहाय्यक परिचारिका प्रसविका -१, तसेच बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या पदे : आरोग्य निर्माण अधिकारी -१, कनिष्ठ लिपिक -१, प्रयोग शाळा तंत्रज्ञ -१, आरोग्य सहाय्यक -१, स्त्री परिचर -१, पुरुष परिचर -१, वाहन चालक -१, सफाई कामगार -१ अशी १५ पदे मंजूर झाली आहेत. त्याचा फायदा जनतेला होईल. शासनामार्फत चांगल्या आरोग्य सुविधा व सेवा मिळतील. कोरोना संसर्ग सुरू असताना पदांना मंजुरी देऊन शासनाने मतदार संघातील जनतेला दिलासा दिला आहे. त्याबद्दल त्याबद्दल आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब, जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब, आरोग्य मंत्री मा. ना. राजेश टोपेसाहेब यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments