प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी एक हात सामाजिक बांधिलकीचा या राबविलेल्या उपक्रमास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हीच खरी सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पोचपावती आहे. या सातत्यपुर्ण सुरु असणा-या या उपक्रमामुळे कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबाचे मनोधैर्य वाढेल असे प्रतिपादन ॲड रवी पाटील यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी एक हात सामाजिक बांधिलकीचा या हेतुने शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालय,आय.टी.आय. व स्वस्तीक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्यासाठी दानशुर व्यक्तींच्या मदतीने पौष्टीक आहार वाटप सुरु आहे. डॉ. एन.के. पाटील व सौ. छाया पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिळाशी येथील स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने व कांदे येथील यशवंत लखु पाटील यांच्या एकसष्टी निमित्त अर्नव एंटरप्राईजेसचे मालक अनिल पाटील यांच्यावतीने आहार वाटप कार्यक्रम प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी डॉ. ऐश्वर्या मोरे यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी पाटील म्हणाले, कोविड बांधवांना उपचार सुरु असताना ख-या अर्थाने पौष्टीक आहार गरजेचा आहे. तोच आहार देण्याचा उपक्रम सुरु आहे. यासाठी १५ दिवस आधी आहार वाटप नोंदणी होत आहे. हे कौतुकास्पद आहे.
यावेळी ॲड. रवि पाटील, विकास साळुंखे, अनिल माने , यशवंत पाटील, डॉ.ऐश्वर्या मोरे, नेत्र चिकित्सक अधिकारी सविता नलवडे, राणी खुडे, दीपक पारदी,अक्षय पाटील, विकास साळुंखे, विनायक गायकवाड,शिवाजीराव चौगुले सचिन पाटील, प्रताप कदम, ,दिनेश हसबनीस, अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.
0 Comments