BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाढदिवसाच्या निमित्ताने विराज कारखान्यात अभिषेक अन् वृक्षारोपण

 

शिराळा: शिराळाचे आमदार व विश्वास - विराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस विराज उद्योग समूहात सामाजिक, आध्यात्मिक स्वरूपाने व कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. यावेळी विराज कारखान्यावरील ज्योतिबा मंदिरात अभिषेक घालून सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

        आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस २६ जून रोजी विश्वास व विराज उद्योग समूह उत्साहात साजरा करण्यात आला. विराज कारखाना परिसरात ज्योतिबा पादुका देवालय आहे. या मंदिराच्या परिसरात गेल्या सात  वर्षापासून विराज उद्योग समूहातील प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आदी प्रबोधनात्मक सामाजिक कार्य पार पाडली जात आहेत. तसेच या मंदिर परिसराचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिर परिसराला एक देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा सामाजिक उपक्रम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मंदिर परिसरात विराज उद्योग समूहाकडून सुरू करण्यात आला आहे.

       यावर्षीही हा सामाजिक उपक्रम उद्योग समूहाकडून उत्साहात राबविण्यात आला. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाचे निमित्त ठेवून हे विविध उपक्रम राबविण्यात आले. विराज कारखान्याचे जनरल मॅनेजर युवराज गायकवाड यावेळी म्हणाले, काही वर्षापूर्वी या ज्योतिबा पादुका मंदिर ठिकाणी शुकशुकाट व माळरान होते. परंतु या माळरानावरती उद्योग उभारण्याचे स्वप्न आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहिले. त्यांच्या स्वप्नाला वास्तवाचा आकार मिळाला आणि या उद्योग समूहाची निर्मिती झाली आहे. गेली अनेक वर्षापासून हा विराज उद्योग समूह यशाचे आलेख पादाक्रांत करत पुढची वाटचाल करीत आहे.

       यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने वाढदिवस नैसर्गिक व अध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते ज्योतिबा पादुका मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरात अभिषेक घालून फार मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जात होते. परंतु यावर्षी करोना महामारीचा कार्यकाळ सुरू असल्याने यावेळी उपस्थितांच्या साठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक, विराज इंडस्ट्रीज चे जनरल मॅनेजर युवराज गायकवाड, अधिकारी सुभाष शेटे , रवींद्र पाटील, उदय पाटील, संदीप कदम, सुभाष पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments