BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत व काम करणाऱ्यांचा सन्मान हीच अण्णांना खरी श्रद्धांजली-नगराध्यक्षा सुनीता निकम

 

शिराळा: कोरोनामुळे अडचणीत असणाऱ्यांना मदत व कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या पत्रकार,नगरपंचायत कर्मचारी व इतरांना आणखी काम करण्याची ऊर्जा मिळावी. म्हणून रुग्णांना पौष्टीक आहार व त्यांच्यासाठी झटणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून होत असलेला सन्मान हीच खरी स्वातंत्र्य सैनिकी यशवंतराव निकम(आण्णा) यांना श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सुनीता निकम यांनी केले.
 नगराध्यक्षा सुनीता निकम व त्यांच्या निकम कुटुंबीयांनी  कै.स्वातंत्र सैनिक यशवंत सावळा निकम यांच्या प्रथम पुण्यतिथी चा खर्च टाळून कोविड रुग्णांना पौष्टिक आहार वाटप व नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग व पत्रकार यांना कोविड योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार प्रसंगी बोलत होत्या.
राजू निकम व उद्योजक संजय निकम यांचे वडिल थोर स्वातंत्र्य सैनिक यशवंत निकम यांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. त्यावेळी ही त्यांनी दहावी , तेरावी आदींचा खर्च टाळून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे किट , औषध वाटप केले होते.  यावर्षी प्रथम पुण्यतिथी निमित्त उपजिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण , तेथे कार्यरत असणारे कर्मचारी वर्गास पौष्टिक आहार वाटप केला.गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप केले. नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग जो कोविड काळात रुग्ण सेवा , मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणे , कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असणारे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्रीराम उर्फ बंटी नांगरे , पत्रकार यांचा कोविड योद्धा म्हणून  सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम , उपनगराध्यक्ष विजय दळवी , मुख्याधिकारी योगेश पाटील ,उद्योजक राजू निकम , उद्योजक संजय निकम , सौ दीपाली निकम , सम्राट निकम , रोहन निकम , सौ प्राजक्ता निकम ,  नयना कुंभार ,अर्चना गायकवाड , सुविधा पाटील , सभापती प्रतिभा पवार , मोहन जिरंगे , संजय हिरवडेकर , सीमा कदम , वैभव गायकवाड उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments