शिराळा तालुक्यात जून महिण्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला असून २४ तासात चांदोलीत १८५ तर पाथरपुंज येथे ३३३ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. या परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात २ मीटर व दोन टी. एम.सी.ने वाढ झाली आहे. चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने पाथरपुंज येथे ३३३मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. वारणा, मोरणा,नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून ओढे,नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाझर तलावांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून करमाळे येथील तलाव भरून पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. सायंकाळी पाच वाजता नाटोली-सागाव दरम्यान मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोकरुड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
0 Comments