BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे महागड्या व्हेंटिलेटरला या स्वस्त उपकरणाचा पर्याय

 


शिराळा येथे  सोलर पॉवर्ड मेकॅनिकल रेस्पिरेटर हे  कोरोना रुग्णांच्यासाठी उपकरण तयार केले आहे. या संकल्पनेचा  वापर एखाद्या कंपनीने केला तर याचा गरीब रुग्णांना जास्त फायदा होणार आहे. या उपक्रमास नवी दिल्लीच्या विज्ञान व तंत्रज्ञान यांचे १० हजाराचे अर्थसहाय्य मिळाले आहे. हा गरिबांचा व्हेंटिलेटर म्हणून नावारूपास येईल.

 येथील कन्या शाळेची विध्यार्थीनी विश्वसाम्राज्ञी माने हिने वडील प्रा.रामराजे माने  यांच्या मदतीने हे उपकरण तयार केले आहे.  सध्या श्वसनाचे विकार व कोविड रुग्णांना श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर हा एकमेव पर्याय आहे. व्हेंटिलेटर बनविणे खूप खर्चिक आहे. उत्पादन कमी असल्याने ते सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. हीच गरज ओळखून शिराळा येथील कन्या शाळेची विद्यार्थिनी विश्वसाम्राज्ञी  माने हिने वडिलांच्या मदतीने हे उपकरण तयार केले आहे.

या उपकरणात नैसर्गिक हवा व ऊर्जा स्तोत्राचा वापर केला आहे. यासाठी लागणारे साहित्य हे सहज उपलब्ध होऊ शकते.

रुग्णांच्या गरजेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करते. रुग्णांच्या श्वसनापासून  बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साइड इतर रुग्ण,डॉक्टर, परिचारिका यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या वायूचे निर्जंतुकीकरण करून पुनः हवेत सोडला जातो. हे उपकरण सौर ऊर्जा,विद्युत व चार्जिंग बॅटरी वर चालते. या उपकरणाचा उपयोग हॉस्पिटल,अँबुलन्स, व घरगुती व्हेंटिलेटर म्हणून सहज करता येतो.


कोरोनाच्या या महामारीत व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.काही ठिकाणी पैसे नसल्याने गोरगरिबांना व्हेंटिलेटर अभावी जीव गेला आहे.ऐकले व वाचले असल्याने सर्व सामान्य रूग्णांना कमी खर्चात  व्हेंटिलेटर म्हणून काय करता येईल का असा प्रश्न कन्या विश्वसाम्राज्ञी हिने मला विचारलं.त्यानंतर आम्ही चर्चा करून हे उपकरण तयार केले. याची पेटंट फाईल तयार केली आहे.

प्रा. रामराजे माने 

या उपकरणाच्या संकल्पनेनुसार त्यात बदल करून एखाद्या कंपनीने ते आधुनिक पद्धतीने बनवले तर ते कमी खर्चात लोकांना उपयुक्त ठरेल.

डॉ.नितीन जाधव


Post a Comment

0 Comments