अंजली कांबळे ( तांदुळवाडी)
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव (ता. वाळवा) चेकपोष्टवर पोलीस कम॔चारी यांचेसाठी बांधणेत आलेले निवारा शेड रात्री वादळाच्या तडाख्यात उडून गेल्याने पोलीस कम॔चारी यांचे हाल झाले.
चक्रिवादळाचा तडाखा सांगली जिल्ह्यात बहुतांश भागाला बसला असुन कणेगाव ( ता. वाळवा) येथे जिल्ह्याच्या हद्दीवर कुरळप पोलीस ठाण्याचे चेकपोष्ट आहे. या चेकपोष्टवर पोलीस कम॔चारी यांचेसाठी बांधणेत आलेले निवारा शेड रात्री वादळाच्या तडाख्यात उडून गेले. पडणारा पाऊस यामुळे पोलीस कम॔चारी रात्रभर पावसाशी व वादळाशी सामना करत आपले कत॔व्य बजावत होते. राष्ट्रीय महामार्गावरील हा चेकपोष्ट अति महत्वाचा ठरत असल्याने पोलीस कम॔चारी यांना हा चेकपोष्ट सोडुन कुठेच जाता येत नाही . जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस राबण्यात व्यस्त असतात.
कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक जाधव यांच्या माग॔दश॔नाखाली या चेकपोष्ट वर पोलीस कम॔चारी कत॔व्य बजावत आहेत .यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर , सहाय्यक पो उपनिरीक्षक जयपाल कांबळे , पो. काॅ. सचिन मोरे , प्रदिप शिंदे , शंतनू ढवळीकर ,रमेश पाटील , बजरंग ढोकळे , राहुल शिंदे . होमगाड॔-- सुशांत काळे , नितीन पाटील , प्रशांत शिंदे, अजुंन डोंबे , प्रदिप पाटील , राजेंद्र महाडीक , अजय माळी . महिला होमगाड॔ -- उज्वला पाटील , छाया हजारे आदि कम॔चारी आपले कत॔व्य बजावत आहेत .
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments