लॉक डाऊन काळात भाजीपाला दर कडाडले असताना आम्ही शेतकरी म्हणून सर्वसामान्य लोकांची व्यथा समजू शकतो. या लॉक डाऊन मध्ये कष्ट करून भाजीपाला व धान्य पिकवणारा शेतकरी आणि काबाड कष्ट करून जीवन जगणारे सर्वसामान्यांचे दिवसेंदिवस आर्थिक गणित कोलमडू लागले.यात शेतकरी व काबाडकष्ट करणाऱ्यांच्या जीवावर व्यापार करणारे लोक मात्र मिळणाऱ्या कमिशनवर मालामाल होऊ लागलेत.ते म्हणतील तो दर द्यावा लागत आहे. आपण जगण्यासाठी ते निमूटपणे घेऊन टीचभर पोटाचा खळगा भरत असतो.पण महागाईने तो खळगा भरत नाही,आणि खिसा रिकामाच रहात आहे. याचीच जाणीव आम्ही शेतकरी पोरांनी ठेवून आपल्या शेतात असणार माल व्यापाऱ्याला ज्या दरात देतो त्याच दरात लोकांना दिला तर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही हेतू साध्य होतील. याच हेतूने आम्ही शिव-भगवान ऑनलाईन शेतकरी बझार ही संकल्पना सुरू केली आहे. त्यास लोकांनी साथ देऊन आपले विनाकारण ज्यादा जाणारे पैसे वाचवून शेतकरी ही वाचवावा.
आमच्या या ऑनलाईन बझार मध्ये आणखी काही शेतकरी बांधव आपल्या भाजीपाल्यासह सहभागी होणार असतील तर त्यांचे स्वागत आहे.त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आपली भाजीपलीच्या विक्रीसोबत सामाजिक कार्याला हातभार लावावा.
-----------------------------------------------------------
आमच्याकडे आमच्या शेतातील मिरची व टोमॅटो होलसेल दरात शिराळा शहरात व परिसरात घरपोच मिळेल
ताजा टोमॅटो -२०रुपये किलो
मिरची ४० रुपये किलो
संपर्क-शिव-भगवान ऑनलाईन शेतकरी बझार
9552571493,9511242647
ज्यांना दहा किलोपेक्षा जास्त माल हवा असल्यास आणखी स्वस्त मिळेल
आमचा पत्ता शिव-भगवान ऑनलाईन शेतकरी बझार शिव भोजनालय कृषी उत्पन्न बाजार समिती शिराळा बस स्थानक समोर शिराळा
संपर्क-9552571493,9511242647
टीप- ऑर्डर दिल्यानंतर माल दोन तासात घरपोच मिळेल .कारण दर दोन तासांच्या ऑर्डर नुसार मालाची तोडणी केली जाते. ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळावा म्हणून ऑर्डर नुसार तोडणी केली जाते.
मागणीनुसार इतर भाजीपाला देण्याची व्यवस्था केली जाईल.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments