चांदोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची लाखो रुपये खर्च करून बांधलेली आकर्षक स्वागत कमानीला वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने चांदोलीच्या सौंदर्य हरवले . सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान येते . २०१८ साली जाधववाडी चेक पोस्ट जवळ जवळपास सहा सात लाख रुपये खर्च करून पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक स्वागत कमान उभी करण्यात आली होती . पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या स्वागत कमानीवर आणि आजूबाजूला चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे प्राणी , पक्षी यांच्या देखील प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या . शनिवारी दुपारपासूनच तालुक्यांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावून तोक्ते वादळाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती . रविवारी आणि सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला . याचा फटका सोमवारी दुपारच्या सुमारास चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या जाधव वाडी चेक पोस्ट जवळ असणाऱ्या भव्य आणि आकर्षक असणाऱ्या स्वागत कमानीस बसला आहे . जोराच्या वाऱ्यामुळे ही स्वागत कमान पूर्णपणे पडली असून आजूबजूला लावलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृती देखील मोडल्या आहेत . यामुळे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे चांदोलीचे सौंदर्य हरपले आहे.
अशी होती कमान
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments