BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एकाच दिवशी आई,वडील,मुलाचा मृत्यू तर आठ दिवसांपूर्वी पुतण्याचा मृत्यू

 



शिरशी (ता.शिराळा) येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला घातल्याने एका आठवड्यात आई,वडील व मुलगा व पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावात शोककळा पसरली आहे.

शिराळा हा डोंगरी व दुर्गम तालुका तसा अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील बहुतांशी लोक हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. तसेच शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील मिल कामगार होते.सेवानिवृत्त झाल्याने आपल्या पत्नीसह १५वर्षा पूर्वी गावी आलेत.शेती करू लागले.त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता.त्याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले.त्याची पत्नी ही पदवीधर आहे. तो इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला.आईला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्याच्या वडिलांना कोरोणाची लागण झाली.त्या दोघांवर उपचार सुरू झाले.आई वाडीलांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. मात्र पुनः वडिलांची तब्बेत बिघडली.दरम्यात मुलाला ही कोरोनची लागण झाली. त्याच्यानंतर वडिलांचे निधन झाले.त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. काल सोमवारी सकाळी पाच वाजता पहाटे वडिलांचे निधन झाले.सकाळी झिमुर कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले.तो पर्यंत आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले.हा झिमुर कुटुंबीयांवर १२ तासात दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासात मुलाचा मृत्यू झाला.झिमुर कुटुंब दुःखात बुडाले.एकाच दिवशी हा आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले.त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला.

आमच्यावर आलेला प्रसंग कोणावर येऊ नये

आमच्या झिमुर कुटुंबातील चार लोक आम्ही गमावले आहेत.सर्वांनी घरी रहा,सुरक्षित रहा आणि आपल्या सर्वांची काळजी घ्या.आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्यावर काय मनाला यातना होतात हे आम्ही झिमुर कुटुंब जवळून अनुभवत आहे.त्यामुळे ही वेळ कोणावर येऊ नये

सौ.आशा झिमुर( जिल्हा परिषद सदस्या)

२३ दिवसाचे प्रयत्न निष्फळ 

झिमुर कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्या चौघांना वाचवण्यासाठी  सलग तेवीस दिवस रात्रंदिवस प्रयत्न केले.त्यांच्या उपचारासाठी जिल्हापरिषद सदस्या आशा झिमुर २३ दिवस झोपलेल्या नाहीत. आठ दिवसांपूर्वी त्यांचा पुतण्या गेल्याने पहिला धक्का बसला त्यानंतर काल दीर,जाऊ आणि पुतण्या यांच्या एकाच दिवशी जाण्याने संपूर्ण कुटुंब खचले आहे. त्यामुळे त्यांचे २३ दिवसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 

१३ तासात कुटुंब उध्वस्त मात्र तिचे नशीब बलवत्तर

सकाळी ५ वाजता वडील,सायंकाळी पाच वाजता आई त्यानंतर सहा वाजता मुलगा असे तेरा तासात कुटुंब उध्वस्त झाले असून त्या मुलाची २१ वर्षीय पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने तिचे नशीब बलवत्तर ठरले असले तरी घरातील तीन सदस्य व आधार गेल्याने तिचे कुटुंब उध्वस्त झाले.

 

 न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

Post a Comment

0 Comments