करमाळे ता.शिराळा येथील कृष्णा रामा पाटील (विनायक आबा)
यांच्या आठवणी स्मरणात ठेवण्यासाठी नातू अमोल बाजीराव पवार (रेठरे हरणाक्ष) यांनी करमाळे मध्ये 10000 (दहा हजार) झाडे लावन्याचा संकल्प केला असून त्याची सुरवात केली आहे.
रामा पाटील उर्फ विनायक आबा यांचे २ मे रोजी निधन झाले आहे. आपल्या आजोबांच्या आठवणी कायम स्मरतात रहाव्या अशी संकल्पना नातू अमोल यांच्या मनात आली. ह्या स्मृती कायम टिकवायच्या असतील तर वृक्षारोपण हा एकमेव व पर्यवरण पूरक उपक्रम असल्याची खात्री पटली आणि पवार कुटुंबियांनी दहा हजार झाडांचे वृक्षारोपण हाती घेतले.
करमाळे ते औंढी रस्ताच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू ला झाडे लावण्यात येणार आहेत. गावातील नागरिकांना झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी अमर पाटील, सुनिल पाटील, राजू कांबळे, हणमंत पवार, मनोज सावंत, ऋषि पाटील,निखिल माने ,सचिन कदम ,सुभाष साठे उपस्थित होतो.क्रुषि अधिकारी कारंडे व ग्रामसेवक राजेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
सिमेंटची जंगले वाढवत असताना झाडांची कत्तल केली जाते . त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. झाडे कमी झाल्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडले आहे म्हणून गेली अनेक वर्षे अमोल पवार आपल्या गावामध्ये झाडे लावत आहेत.गावातील सर्व उपक्रमात त्यांचा सहभाग असतो .
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
👇
--------------------------------------------------------------------
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
---------------------------------------
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
---------------------------------------
0 Comments