शिराळा, ता.२०: बिऊर ता.शिराळा येथे बिऊर फाट्यावरील शेती विभाग कार्यालया जवळील क्वॉलीटी वडा पाव सेंटर दुकाना समोर रोहन प्रताप नाकील (वय २२ )वर्षे रा. नाटोली याच्या कडून चार तलवारी जप्त करून त्याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी,पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम , अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी पेट्रोलिग करुन अवैध्य शस्त्रे बाळगणाऱ्या इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.त्यानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशा इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेकामी खास पथक तयार केले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक शिराळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध्य शस्त्रे , बाळगणारे इसमाची माहिती काढत असताना पोलीस हवालदार सुनिल चौधरी यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये घातक शस्त्रे तलवारी घेवून थांबला आहे .त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व कर्मचारी यांनी छापा घालून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने रोहन प्रताप नाकील रा. नाटोली असे सांगितले. त्यावेळी त्याच्याकडून पांढऱ्या पोत्यातून एक लोखंडी बनावटीची तलवार जप्त केली . त्यास विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता नाटोली येथे घरामध्ये लपवून ठेवलेले ३ तलवारी काढून दिल्या. त्याच्याकडून २,८०० रुपये किंमतीच्या ४ तलवारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी पंचनाम्याने जप्त करून त्याच्यावर शिराळा पोलीसात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत , मारुती साळुखे , सुनिल चौधरी . गजानन घस्ते , कुबेर खोत , मुदस्सर पाथरवट , सुहिल कार्तीयानी , अरुण सोकटे यांनी केली.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments