BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागाव (ता.शिराळा) येथील भारतीय सैन्यदलातील माजी सुबेदार मनोहर कृष्णा पाटील यांचे निधन.

 हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.


प्रसाद मोहिते /सागाव

          सागावच्या शिरपेचातील एक हिरा अचानक गळून पडला अन् सबंध सागाव व सागाव परिसरावर शोककळा पसरली.माजी सुबेदार मनोहर कृष्णा पाटील यांची निधनवार्ता समजताच गावावर शोककळा पसरली.गावात त्यांच्या कुटुंबाला एक विशेष आदराचं स्थान आहे.आपल्या दोन्ही भावंडांसमवेत त्यांनी सैन्यदलाची सेवा प्रामाणिकपणे व निष्ठेने पूर्ण केली.सागावमधील हे एकमेव कुटुंब आहे की या कुटुंबातील तिघे भाऊ सैन्यदलात कार्यरत होवून नुकतेच सेवानिवृत्त झालेत.कै.मनोहर पाटील हे या कुटुंबातील मोठे बंधु सर्व त्यांना आदराने दादा म्हणत असत.

        दादांचा जन्म १७ मे १९६३ रोजी झाला.कुटुंबात अतिशय गरिबी लहान भावंड यांना सावरत आधार देत प्रसंगी इतरांच्या शेतात काम करुन स्वतःचे व भावंडांचे शिक्षण पूर्ण केले.लहान वयात आपल्या सर्व भावडांना वडिलांप्रमाणे आधार दिला.या वाटचालीत त्यांच्या आईची मोलाची अन् खंबीर साथ होती अन् आजही आहे.

        आपल्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढायचे होते,भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचे ठरविले.एकिककडे कौटुंबिक जबाबदाऱ्या व देशसेवेबद्दल ओढ हा दुहेरी संगम होवून अपार कष्ट घेतले व दि.२७ जून १९८० रोजी ते सैन्यात दाखल झाले.काही वर्षात त्यांचेपाठोपाठ त्यांचे धाकटे बंधू श्री.रमेश पाटील हे सैन्यात भरती झाले.इ.१२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच तिसरे बंधू श्री.माणिक पाटील हे ही सैन्यात भरती झाले.घरातील शिस्तबद्ध वातावरण व संस्कारामुळे आज तिनही भावंडाची मुलं उच्चशिक्षित आहेत.

     मनोहर पाटील यांचा सैन्यदलातील प्रवास दि.२७ जून १९८० रोजी सुरु झाला.आर्मड कोर 66 या युनिटमध्ये त्यांनी सबंध सेवा केली.या कालावधीत त्यांनी अमृतसर,जम्मू काश्मीर,राजस्थान - ( जैसलमेर,बिकानेर ),कानपूर,कलकत्ता ,सियाचिन,हिसार या ठिकाणी सेवा केली.

        या सेवाकालात त्यांनी सुबेदार या पदावरती राहून देशसेवा केली.मजबूत देहयष्टी,पिळदार शरीर असल्याने सैन्यदलांतर्गत विविध स्पर्धांत प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले.जसे की क्राॕसकंट्री ,smc fining 2nd Div यामध्ये विशेष प्राविण्य मिळविले.

    देशसेवेत ब्लुस्टार आॕपरेशन,कारगिल आॕपरेशन यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.  २६ जानेवारी १९९२ या दिवशी सुबेदार यांनी दिल्ली येथे झालेल्या संचलनात आर्मड फोर्सचे स्वतः नेतृत्व करत संचलनात सहभागी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.

       भारतीय सैन्यदलात सलग २८ वर्षे त्यांनी सेवा केली.सुबेदार पदावर कार्यरत असताना कडक शिस्त व उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.या कालावधीत त्यांचे धाकटे बंधू श्री.माणिक पाटील यांनी त्यांचे युनिटमध्ये असल्याने रणगाडे व फायरिंग यासंदर्भातील शिक्षण घेतेले व त्यांनीही कारगिल युद्धात आपला ठसा उमटवला होता.

         दादांनी तरुणांना एक संदेशही दिला आहे तो म्हणजे, आपल्याला काय मिळाले यापेक्षा,आपण काय केले व कितपत यशस्वी झालो हे महत्त्वाचे आहे.कोणत्याही कामासाठी सकारात्मक विचार अन् खडतर परिश्रम ही यशस्वी कार्यांची गुरुकिल्ली आहे."

      आज दादांचा जीवनप्रवास सर्वांसाठी एक प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.अचानक असे प्रेमळ व्यक्तिमत्त्व ,प्रत्येकाला मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरविले,दादांच्या जाण्याने सबंध कुटुंबावर,गावावर शोककळा पसरली आहे.दादांच्या कार्यास कोटी ,कोटी सलाम व भावपूर्ण श्रद्धांजली.

      दादांचे पश्चात त्यांची आई,पत्नी,भावंडे त्यांच्या पत्नी ,मुले असा मोठा एकञ परिवार,आहे.त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच परमेश्वराला प्रार्थना.

              



न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा


 .

Post a Comment

0 Comments