BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हवामानातील बदल विनाशकारी धोक्याची घंटा - प्रा.शिवा दुबे

 

👉एकाच दिवशी आई,वडील,मुलाचा मृत्यू तर आठ दिवसांपूर्वी पुतण्याचा मृत्यू शिराळा तालुक्यातील शिरशी येथील घटना. बातमी वाचण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा





शिराळा: तालुक्याला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती व्हावी . लोकसहभाग वाढावा. या उद्देशाने 'पर्यावरण समृद्धी मंच  शिराळा' या समूहाने ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन केले आहे. 
 या  उपक्रमांतर्गत  एस. ए. पी .सी. सी .या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे,  मुंबई आणि पर्यावरण कार्यकर्ती  नुपुर रिसबूड,  बेंगलोर यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले. प्रा.शिवा दुबे म्हणाल्या,  
हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम  गरीब , शेतकरी वर्गावर होत आहेत. 
    सुरूवातीला पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड यांनी हरितगृह वायू परिणाम आणि जागतिक तापमानवाढ होण्यातील माणसाची भूमिका याबद्दल मांडणी केली.त्या म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हे देखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत.पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे.त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरणसंवर्धनाकडे  सजगतेने बघण्याची गरज आहे.
       प्रा. शिवा दुबे म्हणाल्या , वातावरण बदलाचा परिणाम पंचमाहाभुतावर होत आहे. पर्यावरण -हासाबरोबर आर्थिक विषमता देखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगीकीरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योग धार्जिणे असलेमुळे  पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी  ग्रेटा थनबर्ग  ने लहान मुले, मुली यांचेमार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी लहान पाऊल टाकले पाहिजे.  त्याची सुरुवात स्वतःपासून करा .  पर्यावरणाचे नुकसान करणारे  घटक  शोधून  त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी ,आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला  पाहिजे . तसेच पर्यावरणाचे ज्यादा नुकसान करणाऱ्या घटकाकडून दंड व आर्थिक वसुली करून  ती सामान्य जनतेपर्यंत म्हणजेच वातावरण बदलाच्या परिणामा मुळे अडचणीत आलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.त्या पुढे म्हणाल्या, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम  गरीब , शेतकरी वर्गावर होत आहेत.पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर , दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर   , शेतकरी आणि आदीवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो.वातावरणात होणारा बद्दल आणि जागतिक तापमान वाढीस  अनेक  घटक कारणीभूत आहेत.ज्यामध्ये अती वृक्षतोड,ऊर्जेचा गैरवापर, पाणी वापराची विषमता , अन्न साखळीत केलेला मानवी हस्तक्षेप , प्रदूषणास कारणीभूत असणारे उदयोग धंदे, पर्यावरण उपाययोजना संदर्भात शासनाची उदासीनता, पर्यवरणावर शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष्य   या असंख्य कारणामुळे मानवी जीवन नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडलेले आहे. त्यामुळेच, उष्णतेची लाट, वारंवार उद्भवणारे चक्रीवादळ, पाण्याची टंचाई, कोरोनासारखी महामारी, यासारख्या  ज्वलंत समस्या निर्माण होत आहेत. 

 कार्यक्रमाचे स्वागत सचिन करमाळे यांनी केले. प्रास्ताविक जलनायक प्रकाश पाटील यांनी तर  सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी  प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरण तज्ज्ञ मोहन  पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार , करुणा कांबळे, आदी  मान्यवर उपस्थित होते.

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

Post a Comment

0 Comments