शिराळा :कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किमंती वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे वाढवलेल्या रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी रासायनिक आणि खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडाजी यांचेकडे खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली आहे.
खा. माने यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, रासायनिक खतांच्या किमंतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालेली आहे. गेल्या दिड वर्षापासून शेतीची कामे जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे.
सध्याची रासायनिक खतांच्या किमंतीची वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. खताच्या किमंती वाढु लागल्याने उत्पादन
खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने
उत्पादन खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांचे दर वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
तरी सदर खतांचे दर कमी करुन कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना न्याय आणि दिलासा द्यावा अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी मंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments