बिळाशी: बिळाशी दुरंदेवाडी तालुका शिराळा येथील राॅकेलच्या दिव्यावर अभ्यास करणा-या मुलांच्या घरी ग्रामीण कथाकार, साहित्यिक बाबासाहेब परीट यांनी वडील अण्णा परीट यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने वीज जोडणी करून दिली.सदरच्या घरातील मुले राॅकेलच्या दिव्यावर व डांबाखालील उजेडात अभ्यास करत होती.अचानक घरी वीजजोडणी केल्यामुळे मुलांच्या व घरातील सर्वांच्याच चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता...
याबाबतची माहिती अशी की सुनंदा दगडू खोत या रोजंदारी करून पोट भरतात.त्यांच्या घरी अद्यापही लाईट नव्हती.एक मुलगी दहावीत शिकत आहे तर दुसरी नववीत व मुलगा सातवीत आहे. परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेने आणि कागदपत्रांची जंत्री होत नसलेने त्यांना वीज घेणे जमलेच नाही.याबाबत दखल अण्णा परीट यांनी घेतली.त्या मुलांच्या घरी वीज जोडण्यासाठी प्रयत्न कर असे मुलगा ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांना सूचना केली. याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करुन अनामत रक्कम भरून फिटींगचा सर्व खर्च परीट यांनी केला. कोरोणाच्या काळातही स्टॅम्प व अॅफिडेविट करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केला.अखेर काल सायंकाळी पाच वाजता सत्तर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्या घरी वीज आली.दिव्यावर अभ्यास करणाऱ्या त्या मुलांच्या चेहर्यावर आनंद झळकला. दहावीत शिकणारी धनश्री खोत म्हणाली, खूप अभ्यास करून मला काही तरी बनायचं आहे. माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा घरात वीज आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. रॉकेल मिळत नव्हतं गोडेतेलाच्या दिव्यावर मी अभ्यास करत होते. आज आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे.
ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट म्हणाले, दरवर्षी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मदत करतोच.पण वडीलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिकणार्या मुलांसाठी वीज देण्याची वडिलांची इच्छा आनंद देणारी आहे.मुलांच्या भविष्यासाठी वडिलांच्या वाढदिवसाची भेट म्हणून केलेली वीज जोडणीची भेट खूप महत्त्वाची आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुनंदा दगडू खोत या मुलांना शिकवण्यासाठी आग्रही आहेत. त्या म्हणाल्या,आमचा उभा जन्म अंधारात गेला पण आज लाईट आल्याचं समाधान आहे.
वीज जोडणी लवकर व्हावी यासाठी वीज वितरण कंपनीचे वायरमन योगेश पाटील, अभिषेक शेणवी व विकास यादव (कोकरूड),बी.डी.रोकडे यांनी तातडीने फिटींग करून दिले.बिळाशीचे उपसरपंच दत्तात्रय मगदूम यांनी तातडीने टेस्ट रिपोर्ट दिला,कुसाईवाडी ग्रामसेवक सचिन पाटील यांनी सहकार्य केले.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'
घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !
संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.
मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
0 Comments