विनायक गायकवाड (अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ शिराळा)
शिराळा म्हंटल की डोळ्यासमोर येतात ती तात्या भांडवले यांची जातीवंत खीलार बैल जोडी, देखणा छकडा...
घरची परिस्थिती बेताची असून देखील बैलांच्या प्रेमापोटी या माणसानं घरादारावर तुळशीपत्र ठेऊन पोटच्या पोरांपेक्षा बैलांना जास्त जपल. रोजगार व दुसऱ्याची शेती वाट्याने केली. अनेक खोंडांना सराव, तालीम देऊन जातीवंत बैलांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं. पंचक्रोशीत बैलांसाठी हे नाव फेमस झाल. प्रसंगी तोटा सहन करून त्या काळात शर्यतीचा नाद फक्त बैलांच्या प्रेमापोटी केला. अस्सल जातीवंत बैल बघायचा तर तो तात्या भांडवले यांच्या गोठ्यातच. अनेक जातीवंत बैलांना त्यांनी आपल्या दावणीत लहानच मोठ्ठं केलं. त्यांचं संगोपन निगा राखली. शेकडो बैलं आज त्यांच्या दावणीतून काही विक्री होऊन तर काही मैत्री खातर सांभाळायला दिलेली आहेत.
अलीकडे शर्यती बंद झाल्या. मात्र तात्या भांडवलेंच बैल प्रेम काही कमी झालं नाही. रोजगार करत, दुसऱ्याची शेती वाट्यान करत त्यांनी हे आपल बैल प्रेम आजही जपल होतं. सोमवार पर्यंत त्यांच्या दावणीला ३ म्हैसी बरोबर सुगर हा मोठा बैल तर सुल्तान हे खोंड अशी जातीवंत खीलार जोडी होती. सोमवारचा सूर्य ढगाआड गेला आणि इकड तात्या भांडवले यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात म्हातारी आई आपल्या पोराची ही डौलदार संपत्ती राखत बसायची.
अचानक लागलेल्या आगीमुळ ती ही भांबावून गेली. मदतीला हाका मारू लागली. तिन्ही सांज झालेली होती. शेजारच्या वस्ती वरची शेतकरी लोकं आपापल्या घरी गेले होते. सगळा शिवारच जणू निर्मनुष्य झाला होता. हाका मारून देखील कोणी मदतीला येत नाही म्हंटल्यावर म्हातारी आई जनावरांची दावी सोडायला दावणीकडे निघाली. आगीने तोवर रौद्र रूप धारण करून तांडव करायला सुरवात केली होती. म्हातारी आई धाय मोकलून रडत होती. जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती. कशी बशी धाडस करून एका म्हशीला आणि रेडीला दावं सोडून तिन मोकळं केलं. तोवर सुगर आणि सुल्तान यांना आगीने आपल्या मगर मिठीत जखडून टाकले होते. आगीच्या तावडीतून सुटण्यासाठी ते जीव धडपडत होते. त्यातच शेजारच्या म्हशी होरपळून निघाल्या होत्या. आग मी म्हणत होती.
काळाच्या पुढे गुडघे टेकत म्हातारी आई हतबल होऊन गळीत गात्र झाली होती. डोळ्यासमोर पोटच्या पोरांन हाडाची काड करून कमावलेली जिवंत संपत्ती होरपळून जीव सोडत होती. दावणीला असलेली पाच सहा जातीवंत जनावर आगीच्या भक्ष स्थानी पडून सगळीच्या सगळी दावण काही क्षणात रिकामी झाली होती. तात्या भांडवलेंचा जीव की प्राण असलेला सुगर आणि सुल्तान सोमवारच्या ढगाआड जाणाऱ्या सूर्याबरोबर माती आड होत होतीत.
आगीची बातमी समजताच गावातल्या घरातून तात्या, मुलगा, कुटुंबीय, शेजारी, मित्र मंडळी यांनी गोठ्याकडे धाव घेतली. मात्र तोवर वेळ निघून गेली होती. हताश होऊन जळत्या गोठ्यकडे पाहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. तोवर अनेक नागरिक जमा झाले होते. जमलेल्या पैकी प्रत्येकाने आपापल्या परीने आग विझवण्यासाठी, जनावरांच्या अंत्य संस्कारासाठी, पंचनाम्यासाठी प्रयत्न केले. तिथे जमलेल्या शेकडो लोकांना मध्यरात्री एकत्रित करून आर्थिक मदतीचे आवाहन देखील केले. त्यातून त्याचवेळी काही रोख रक्कम जमा सुद्धा झाली. आजही होते आहे. अनेक दानशूर हात पुढे येत आहेत. शासन देखील मदत देईल. मात्र तोपर्यंत मोकळी झालेली दावण पुन्हा उभी करायची हाय...
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments