BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तो पर्यंत १८ वर्षावरील लसीकरण नाही


सांगली दि. 28 (जि.मा.का.) : 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीरकण करण्यात येणार होते. कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापी सध्यस्थितीत लसींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जो पर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. 

18 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सदरची माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलीद पोरे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु असून ज्यांना पहिला डोस दिला आहे. त्यांचा दुसरा डोस विहित वेळेत देण्यात येत आहे. यावयोगटातील नागरीकांचे लसीकरण पुर्वीप्रमाणे सुरु राहील. 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर तसेच याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना  प्राप्त झाल्यावर या वयोगटालाही तात्काळ लसीकरण करण्यात येईल तो पर्यंत या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी  आपला जीव धोक्यात घालून या महामारीच्या काळात सेवा बजावत आहेत याची जाणिव प्रत्येक नागरीकांनी ठेवली पाहिजे. अशा कर्मचाऱ्याबरोबर, वाद घालणे, हुज्जत घालणे, अपमानास्पद वागणूक देणे, तुच्छतेने बोलणे असे प्रकार केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

जिल्ह्याला नव्याने 45 व्हेंन्टीलेटर प्राप्त

जिल्ह्याला सध्या 45 व्हेंटीलेटर नव्याने प्राप्त झाले असून यापैकी 25 व्हेंन्टीलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार उर्वरीत 20 व्हेंन्टीलेटर जिल्ह्यातील रुग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यात 35 ते 40 टन ऑक्सिजन वापरात येते आवश्यकतेनुसार साठा जेमतेम उलब्ध करुन घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे 75 टक्के लसीकरण झाले आहे. लस टंचाईमुळे 18 वर्षावरील नागरिकांना 1 मे पासून करण्यात येणारे लसीकरण पुढे जाण्याची शक्यता असून या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी या वयोगटासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन ऐवजी प्री रजिस्ट्रेशची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर रजिस्ट्रेशन होणार आहे. गावाला जेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होणार आहे. त्याप्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करुन नये. रजिस्ट्रेशन प्रक्रियेत शिक्षकांनी खुप मोठी भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले. झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु आहे. लसीकरण प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी प्रसंगानुरुप कठोर भूमिका घेवून कंन्टेमेंट झोन  प्रक्रिया राबविण्याची अंमलबजावणी करावी असेही ते यावेळी म्हणाले.

दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे दिनांक 29 एप्रिल रोजीही लसीकरण बंद राहील. लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.  

पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------


Post a Comment

0 Comments