BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सफरचंद निर्मितीत शिराळा तालुक्याचा "विजय"

 


जगात अश्यक्य असे काहीच नाही. फक्त करण्याची धमकी आणि उर्मी असावी लागते.त्यासाठी वयाचे बंधन नाही. समाज माध्यमाच्या माध्यमातून नजरेत भरलेले सफरचंदाचे स्वप्न सत्यात उतरवून  या अनोख्या प्रयोगाचा शिराळा तालुक्यात झाला "विजय"

शिराळा तालुक्यातील देववाडीच्या  विजय सर्जेराव खोत या सेवानिवृत्त एस .टी.च्या वाहक प्रयोगशील शेतका-याने वाळवा तालुक्यातील डोंगरवाडीच्या शिवारातील माळरानात बारा गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या रोपांची लागण करून यशस्वी प्रयोग केला आहे .डोंगरात काय कुसळच पिकणार कि म्हणून हिंणवणा-या हितचिंतकांना हि मोठी चपराक ठरणार आहे .कारण ज्या प्रदेशात सफरचंदाची लागवड केली जाते त्याठिकाणी सरासरी लागण केल्यापासून तीस-या वर्षी फळे मिळायला सुरुवात होते .मात्र विजय खोत यांनी वर्षभरापुर्वी लावलेल्या काही झाडांना चांगल्या दर्जाची फळे दिसू लागली आहेत .विजय खोत एस.टी.च्या सेवेत होते तरीही प्रत्येक वर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करून ऊसाशिवाय केळी,शेवगा ,पपई, गुलाब फुले  असे वेगवेगळे उत्पादन घेत होतेच .आता तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी चिकाटी सोडलेली नाही .



    सोशल मिडीयाच्या  युट्युब वरील माहिती बघून त्यांनी हिमाचल प्रदेश गाठले हिमाचल प्रदेशातील विलासपूर येथील शेतक-याची माहिती काढून त्याच्या शेतातील सफरचंदाची बाग बघून एक वर्षापूर्वी त्यांनी सफरचंदाच्या  चार वेगवेगळ्या जातीची  १७५ सफरचंदाची रोपे २०० रुपये प्रमाणे खरेदी करून बुकिंग करून ठेवली, त्यांना नोव्हेबर २०२० या महिन्यात रेल्वेतून ही रोपे का-हाड रेल्वे स्थानकावर मिळाली .डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी डोंगरवाडी गावाजवळच्या त्यांच्या पत्नीच्या नावे असणा-या चार  एकर क्षेत्रापैकी १२ गुंठे क्षेत्रावर ३ X ३ व्यासाचे खड्डे घेवून त्यामध्ये रोपांची लागण केली .यावेळी त्यांनी प्रत्येक खड्ड्यात दोन ट्राँली गाव खत घातले. त्यांचा वडिलांच्या आजर पणामुळे बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ५० रोपे खराब झाली मात्र सध्या असणारी १२५ रोपे अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहे ,खत ,ओषधांचा शून्य खर्च वर्षभरात केला आहे ,पाणी अतिशय कमी लागत असल्यामुळे पाण्याचेही व्याप कमी आहे .जून महिन्यात झाडांची छाटणी केल्यामुळे आत्ता आलेल्या फुटव्यांना चांगली फुलकळी पडली होती त्यातील काही झाडांना फळे लागली आहेत .हार्बन,अण्णा,डोअर शेट गोल्ड या जातीची रोपे सध्या शेतात आहेत ,त्यामुळे फळे लागताना मागे पुढे लागत आहेत ,पुढील वर्षापासून चांगली फळे मिळणार आहेत .वर्षभरात झाडांना फळे लागली आहेत याचा अर्थ येथील वातावरण पिकाला पोषक आहे ,त्यामुळे पुढील वर्षी फळांची सख्या बघून क्षेत्र वाढवणार असल्याचे श्री खोत यांनी सांगितले .सरासरी १ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगीतले ,श्री खोत यांनी या सफरचंदाच्या बागेत अंतरपीक म्हणून उन्हाळी भुईमुगाची लागण केली आहे ,त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही अंतरपीक म्हणून घेतल्या आहे .यातही त्यांनी दूरदृष्टी ठेवून प्रयोग केला आहे झाडांच्या बाजूच्या मोकळ्या क्षेत्रात तण डोके वर काढेल म्हणून त्यांनी अंतरपिके घेतली आहेत .कोणत्याही तणनाशकाचा ते शेतात मारा करीत नाहीत . विजय खोत यांची देववाडी गावात दोन एकर शेती आहे त्या क्षेत्रात ऊस लागवड आहे .

 मी छंद म्हणून शेतात वेगवेगळे प्रयोग घेत आहे ,उत्पन्न किती मिळेल याचा कधी विचार केलेला नाही ,मात्र सफरचंदाची लागवड आपल्या भागात यशस्वी होत आहे ,हे सध्या झाडांना लागलेली फळे बघून मनस्वी आनंदही होत आहे .द्राक्ष ,डाळींबा साठी औषधांचा मारा करावा लागतो मात्र माझ्या बागेत औषध ,खताचा खर्च शून्य आहे ,पुढील वर्षी आणखी क्षेत्र वाढवणार आहे .त्याच बरोबर इतर पिकांच्यासाठीही यापुढे सेंद्रिय खत वापरण्यावर  भर देणार आहे .

 

विजय खोत शेतकरी

---------------------------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------



 

Post a Comment

0 Comments