शिराळा: महिलेचे दुःख ही महिलाच जाणते. पती व्यसनाधीन असेल संसाराचा गाडा हकताना मनाला किती यातना होतात याची जाणीव महिलेलाच असते. आशा आपल्या भगिनींचे दुःख, वेदना आपल्या हातून कशा कमी करता येतील यासाठी गेली आठ वर्षे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून साधना पाटील ह्या प्रयत्नशील आहेत. ८ वर्षात ६ हजार पैकी जवळपास साडे चार हजार लोकांना व्यसनमुक्त करून त्यांनी काळवंडलेल्या संसारात पुनः उजाळा देण्याचे काम केले आहे. अशी ही व्यसनमुक्तीची "साधना" अनेकांचे संसार पुन्हा उभारू लागली आहे.
साधना पाटील ह्या इंग्लिश आणि मानसशास्त्र विषयाच्या दोन वेळा पदवीधर असून त्या एम.ए.बी.एड आहेत. त्यांनी स्कुल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे. त्यांचे पती डॉ.राजाराम पाटील यांचे शिराळा येथे हॉस्पिटल आहे.त्या हॉस्पिटलमध्ये जात असल्याने अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर साहेब माझ्याकडे उपचार एवढे पैसे नाहीत. पतीला दारूच व्यसन. रोजगार करून कसं तरी पोरांना जगवतेय. तुमच्याकड असणारं औषध द्या.काय कमी पडलं पैसे तर परत आणून देते. हा डॉक्टरांशी होणारा रुग्णांनाचा संवाद त्या नेहमी ऐकत असतं. शिवाय सकाळच्या तनिष्का व्यासपीठचे काम करत असून सखी मंचच्या त्या अध्यक्षा असल्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक महिलांची व्यसनाधीन पतींची कैफियत त्या ऐकत होत्या.
त्यामुळे एक महिला म्हणून त्या संवादाने त्यांच्या मनात काहुर माजू लागले. आपले पती डॉक्टर म्हणून रुग्णांच्या शारीरिक वेदना कमी करत आहेत.पण त्या कुटुंबाच्या वेदना कमी करण्यासाठी त्या वेदनेचे असणारे मूळ व्यसन हे नष्ट केले तर ते कुटुंब मानसिक दृष्टीने निरोगी होऊन सुखी होईल हा विचार त्यांच्या मनात आला. आपल्या पतीशी चर्चा करून त्यांनी व्यसनमुक्तीची मशाल हाती घेतली. त्यांनी आपल्या पतीच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिलांशी त्यांच्या पतीच्या व्यसनाधीनते बाबत चर्चा केली. मनात जिद्द असेल ,कुटुंबाचं सहकार्य असेल तर, ही नशायात्रा रोखून तो पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. उध्वस्त झालेलं कुटुंब पुन्हा सावरू शकतं हे महिलांच्या मनावर प्रथम बिंबवले. तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो याचा आत्मविश्वास त्या महिलांच्या मनात निर्माण करून त्यांच्या पतीला समुपदेशन करण्यास सुरवात केली. आता पर्यंत जवळपास सहा हजार लोकांना समुपदेशन केले.त्यापैकी सुमारे साडे चार हजार लोक व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांचा संसार सुखाने सुरू झाला आहे.उर्वरित लोकांना आणखी समुपदेशन सुरू आहे. ते ही लवकरच या व्यसनमुक्तीच्या प्रवाहात येतील याची खात्री आहे.
व्यसनमुक्ती ही मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी काळाची गरज बनली असून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे .अनेक पिढ्या नेस्तनाबूत करणारा घटक हा व्यसनाधीनता आहे. २० ते ३० वयोगटातील तरुण मुलं अगदी सहज प्रयोग ,धाडस, उत्सुकता किंवा सोशल स्टेटस जपण्यासाठी दारूच्या आहारी गेली आहेत. देशाचे भविष्य असणारी ही पिढी वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यसनमुक्तीची गरज आहे.
सौ.साधना राजाराम पाटील( व्यसनमुक्ती समुदेशक
यशवंत व्यसनमुक्ती केंद्र 32 शिराळा)
------------------------------------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
0 Comments