जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२०-२१ चा पद्मभूषण वसंत दादा पाटील क्रीडा पुरस्कार शिराळा तालुक्यातील चरण येथील अरुण रमेश रेळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पद्मभूषण वसंत दादा पाटील क्रीडा पुरस्काराच्या जिल्हा निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी जाहीर केले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. अरुण रेळेकर हे गेल्या २७ वर्षापासून जिल्हा तायक्वानडो संघटनेचे महासचिव सुरेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तायक्वानडो - कराटे या क्रीडा प्रकारात कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज वर शिराळा शाहूवाडी तालुक्यातील अनेक खेळाडूनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत विविध पदके पटकावत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी कराटे तायक्वानदो चे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. अरूण रेळेकर हे सध्या शासनाच्या खेळाडुंसाठी ५ टक्के राखीव असणाऱ्या कोट्यातून ग्रामसेवक म्हणून गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुला-मुलींना खेळाडुंना स्वसंरक्षण चे प्रशिक्षण तसेच पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कामगिरी ची दखल घेत २०१६ मध्ये त्यांना मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने देखील सन्मानीत करणेत आले होते. अरुण रेळेकर यांना या वसंतदादा क्रीडा पुरस्कारासाठी सुरेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर अडव्होकेट मयूर लोंढे यांनी सहकार्य केले.।
--------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments