BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जो पर्यंत मोबदला मिळत नाही तो पर्यंत कालव्याची कामे बंद ठेवा-नाटोली ग्रामस्थांचा इशारा

 


शिराळा: सागाव फाटा ते नाटोली दरम्यान वारणा डाव्या कालव्याचे चालू असलेले खुदाईचे काम येथील शेतकऱ्यांना कालव्यात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने काम बंद पडून जो पर्यंत मोबदला मिळत नाही तो पर्यंत काम बंद ठेवण्याचा इशाला दिला.

          सन २०१० च्या दरम्यान येथील शेतकऱ्यांच्या वारणा कालवा प्रकल्पाच्या कामात गेलेल्या जमिनीसाठी ८१० रु.प्रतिगुंठा अशा दराने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला जाहीर केला होता. संबंधित शेतकऱ्यांच्या नावे आला होता.परंतु योग्य मोबदला नसल्याने काही शेतकऱ्यांनी तो स्वीकारला नाही.त्यानंतर सन २०२० पर्यंत १० वर्षे सदर कालव्यांची कामे बंदच होती. गेल्या महिनाभरापासून सदर कामे सुरू झाली आहेत.बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या दहा वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना विचारात न घेता शासनाच्या नावे लागल्या असल्याची काही शेतकऱ्यांनी माहिती दिली. बहुतांशी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये वाहने चालवत, शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करीत नुकसान केले असल्याच्या संतप्त भावनेतून येथील शेतकऱ्यांनी, महिलांनी संघटित होत चालू असणाऱ्या कामाच्या ठिकाणी आंदोलन करीत ठिय्या मांडून काम बंद पाडले.

        यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक,सत्यजित देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील,यांनी आंदोलन स्थळी भेट देत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही.तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. यावेळी सुखदेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      शेतकऱ्यांना जमिनीचा अल्प मोबदला हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही.तोपर्यंत आम्ही  शेतकऱ्यांच्या  पाठिशी ठाम उभा राहू असे आश्वासन सत्यजित देशमुख यांनी दिले.


      आंदोलनस्थळी तहसिलदार गणेश शिंदे, उपअभियंता अनिल लांडगे यांनी भेटी देत शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. तहसिलदार गणेश शिंदे यांनी सदर विषय भूसंपादन विषयक सर्व रेकाॕर्डस तपासून,सखोल माहिती घेऊन,प्रांताधिकारी यांच्या समवेत मंगळवार (दि.९ मार्च) रोजी तातडीची बैठक आयोजित करून याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल.असे शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी बाबासो  नाकील,बाबासो पाटील ,तानाजी पाटील,तानाजी निंबाळकर, बबन पाटील, अजित पाटील,काशीनाथ पाटील यांच्यासह शेतकरी व महिलाउपस्थित होते.



--------------------------------------------------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments