वाळवा :हुतात्मा संकुलाचा एक ध्येयवेडा तरूण , सर्वांना बरोबर घेऊन जाणारे , जनसामान्यांचा आधारस्तंभ , सर्वांना हवेहवेसे वाटणारे स्व.अरून भैय्या नायकवडी यांच्या दिनांक २४/२/२००५ रोजी आकस्मिक निधनाने हुतात्मा संकुलाची व परिसरातील सामान्यांची न भरून येणारी हानी झाली व हुतात्मा संकुल पोरके झाले . त्यांची चिरंतन आठवण आणि त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून हुतात्मा संकुलातर्फे दरवर्षी स्व.अरूण भैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार दिला जातो . या वर्षीचा १६ वा पुरस्कार मा.मीनाताई शेषू ज्येष्ठ समाजसेविका , सांगली यांना जाहीर करण्यात येत आहे . मा.मीनाताई शेषू ज्येष्ठ समाजसेविका एडस निर्मुलनासाठी जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जपली वाळव्यामध्ये १ ९ ८८ साली झालेल्या दलित , आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनापासून डॉ . नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सर्व सामाजिक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला . त्यांच्या अंगी साहित्यीक , सांस्कृतिक , शैक्षणिक व वैद्यकिय क्षेत्र व पत्रकारिता यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना या वर्षीचा स्व.अरूण भैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार जाहीर करीत आहोत . या वर्षीचा १६ वा पुरस्कार हुतात्मा उद्योग व शिक्षण समुहा मार्फत स्व.अरूणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे . कामगार चळवळ व सामाजिक कामाचा विचार करून या वर्षीचा केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे वतीने स्व.अरूण भैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार बुधवार दि .२४ / २ / २०२१ रोजी देण्यात येणार आहे . या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह , मानपत्र व रू .२५००० / - रोख असे आहे . आतापर्यत सदर पारितोषिक मे.हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना , मे.हुतात्मा सहकारी बँक , ऊस उत्पादक श्री.मोहिते ( शिरगांव ) , प्रा.डॉ.बाबुराव गुरव ( सामाजिक कार्यकर्ते ) , प्रा.अच्युत माने , निपाणी , प्रा.रा.कृ . कणबरकर सर ( माजी कुलगुरू , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ) , कै.नरेंद्र दाभोळकर , मा.अशोक घोरपडे , दैनिक सकाळ पत्रकार व कॉ.किशोर ढमाले , कॉ.नरसैय्या आडाम , सामाजिक कार्यकर्ते , श्री.अरूण नरके , श्री . पोपट पवार , आदर्श सरपंच , हिवरेबाजार , जि.अहमदनगर , मा.पद्मश्री डॉ.रविंद्र कोल्हे व पद्मश्री स्मिता कोल्हे इ.विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान केलेले आहेत . या पुरस्कारातून प्रेरणा घेवून कला , क्रिडा , साहित्य , पत्रकारिकता , सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन उमेद मिळेल . नवीन पिढीत असे कार्यकर्ते घडावेत यासाठी हा उपक्रम राबविणेत येत आहे . तसेच स्व.अरूण भैय्या नायकवडी यांनी आपले करियर अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये घडविले . स्व.अरूण भैय्या नायकवडी यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ दापोली येथे पदव्युत्तर शिक्षणामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनीस स्व.अरूण भैय्या नायकवडी यांचे नावे पुरस्कार देवून गौरविण्यात येते . या वर्षीचा पुरस्कार कु.श्वेता मयेकर यांना देणेत येणार आहे अशी माहिती कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा.श्री.वैभवकाका नायकवडी यांनी दिली.यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.बाबुराव ज्ञानदेव बोरगांवकर , संचालक श्री . शिवाजी अहिर , श्री.संताजी घोरपडे , दुध संघाचे व्हा.चेअरमन श्री.भगवान पाटील , संचालक श्री.बाळासाहेब पाटील , श्री.सावकर कदम , हुतात्मा बझार श्री.दिनकर बाबर , हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील सर्व पदाधिकारी अधिकारी व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. धिरजकुमार माने व त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित होते .
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments