खानापूर तालुक्यातील एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि कुर्ली सुपुत्र प्रसिद्ध गलाई व्यवसाईक स्व. शहाजीशेठ पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे खानापूर तालुक्याची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, जमिनीवर पाय असणारा आभाळाएवढा घट्ट आणि दिलदार मनाचा माणूस हरपला, गलाई बांधवांचा आणि कुर्ली गावचा आधारवड हरपला, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी शोकसभेत आदरांजली वाहिली.
नवी दिल्लीतील करोलबाग येथे गलाई व्यवसायिक म्हणून शहाजीशेठआप्पा पाटील हे गेल्या 35 वर्षापासून वास्तव्यास होते. परंतु त्यांनी गावाशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही. खानापूर तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. अशा या एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्वाची अकाली एक्झिट झाल्यामुळे संपूर्ण तालुका हळहळला. कुर्ली येथे झालेल्या शोकसभेत आमदार अनिलभाऊ बाबर, शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक प्रतापशेठ साळुंखे, जेष्ठ नेते रामरावदादा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र फार्मसी कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील, विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, माजी नगरसेवक अॅड. सुमित गायकवाड, सुरेशदादा पाटील, हिंदुराव पाटील यांच्यासह गलाई, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी स्व. शहाजीशेठ पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments