विटा: युवा नेते सचिनभैय्या शिवाजी मेटकरी यांची विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत निवडीचे अधिकृत पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदीसचिनभैय्या मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांचे नेतृत्व सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यासाठी विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सचिन मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , यांच्या विचारांवर निष्ठा ठेऊन वाटचाल करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड. बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी युवकचे सांगली जिल्हाध्यक्ष भरत देशमुख आणि माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून विटा शहरात राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मला मिळालेल्या राष्ट्रवादी युवकच्या विटा शहर उपाध्यक्ष पदाच्या संधीचे सोने करू, असा विश्वास राष्ट्रवादी युवकचे नूतन विटा शहर उपाध्यक्ष सचिनभैय्या मेटकरी यांनी या निवडीनंतर बोलताना व्यक्त केला.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments