BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीतून उखळू ते उदगिरी २० किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीचा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

 

वारणावती (ता.शिराळा ) येथे चांदोली राष्टीय उद्यान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उखळू ते उदगिरी या २० किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीचा शुभारंभ करताना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील सोबत आमदार मानसिंगराव नाईक,वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते , तहसीलदार गणेश शिंदे,सरपंच वसंत पाटील


 शिराळा, ता.१४: चांदोली राष्टीय उद्यान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उखळू ते उदगिरी या २० किलो मीटर अंतराच्या जंगल सफारीचा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील  व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

वारणावती (ता.शिराळा) येथे वन्यजीव विभागाच्या कार्यालयात जंगल सफारी शुभारंभ झाला.

जंगल सफारी शुभारंभ व्हिडिओ



वन्यजीव विभाग चांदोली व उखळू ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांच्या मार्फत ह्या जंगल सफरीचे आयोजन केले आहे. सध्या शिराळा तालुक्यातील झोळंबी येथे २१ किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्यातील उखळू पासून उदगिरी पर्यंत ही जंगल सफारी सुरू झाल्याने मणदूर प्रमाणे उखळू येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या जंगल सफारीसाठी १६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते , तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उप अभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, वनक्षेत्रपाल जी.एच. लंगोटे,  वनपाल डी.के.यमगर,  एच.ए. गारदी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, उखळूचे  सरपंच राजू मुटल, मोहन पाटील, राजू वडम, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे उपस्थित होते.


प्रवेश शुल्क १२ वर्षा आतील मुलांना १५ व प्रौढ ३० रुपये प्रती व्यक्ती,

१२०० रुपये सफारी वाहन व वाहन प्रवेश शुल्क १०० रुपये

गाईड शुल्क २०० रुपये 

शैक्षणिक सहलीसाठी शालेय विध्यार्थी १० व महाविद्यालयीन विध्यार्थी २० रुपये प्रत्येकी शुल्क रहाणार आहे.

उद्यानात प्रवेश वेळ सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत असून गुरुवारी उद्यान बंद राहील .वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पास मिळणार आहेत.

हे पाहता येणार

तांबवे टॉवर

उदगिरी मंदिर

कोकण दर्शन

 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले

Post a Comment

0 Comments