शिराळा,ता.८: येथील सोमवार पेठमधील शिवशक्ती मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून दोन लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रकाश नंदु भालेकर ( वय २८ रा.निगडी , ता.शिराळा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून १लाख ७४हजार ४७५ रुपये किमतीचे मोबाईल व ४० हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकुण २लाख १४ हजार ४०५ रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे .
याबाबत माहिती अशी की , मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सोमवार पेठ येथे संदीप अरुण शेटे यांचे मोबाईल चे दुकान आहे.गुरुवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ८:३० ते शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान या दुकानाचे कुलूप तोडून विक्रीसाठी असणारे २ लाख रुपये किंमतीचे २० ते २२ मोबाईल अज्ञात चोरट्यानी चोरून नेले होते. हवालदार पी.व्ही. रजपूत हे तपास करत होते.
आज सोमवार ता. ८ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, प्रकाश नंदु भालेकर ( वय २८) हा शिराळा बाजारपेठ येथे मोबाईल विक्रेत्याकडे मोबाईल विक्री करण्याकरीता आला असुन त्याचेकडे मोबाईलचे बिल नाही .
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे शिराळा पोलीस गुन्हे अन्वेशन पथकाचे कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावुन मोबाईल विक्री करण्याकरीता फिरत असणारा संशयित प्रकाश भालेकर ताब्यात घेवुन तपास केला असता गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल मिळुन आला यावेळी चौकशी केली असता त्याने शिवशक्ती मोबाईल शॉपी दुकानाचे दरवाज्याचे कुलुप तोडुन त्यामधील मोबाईलची चोरी केली असल्याचे कबुल केले. यानंतर त्याचे राहत्या घरातून १ लाख ७४ हजार ४७५ रुपये किमतीचे मोबाईल व ४० हजार रुपये किमतीची ची गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटर सायकल ( क्रमांक एम एच १४ डी जी ३४३२) असा एकुण २ लाख १४ हजार ४७५ रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे .
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कालीदास गावडे , महेश साळुखे , प्रतापसिंह रजपुत , नितिन यादव , रणजित टोमके , तुषार जाधव यांनी केली .
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
. . . . . . . . . . . . . . . . . . .
0 Comments