शिराळा: सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या चार शाखांचे व्यवहार शिराळा येथील मुख्य शाखेतून १ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आदिनाथ दगडे यांनी दिली.
यावेळी दगडे म्हणाले,बँकेच्या कोल्हापुर, सांगली, नेर्ले ( ता.वाळवा), मलकापूर(कराड) येथील सर्व ग्राहकांना कळवणेत येते की , भारतीय रिझर्व बँकेद्वारे ०३ फेब्रुवारी २०२१ पासून बॅकेस दि बैंकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार शाखेच्या इमारतीच बँकेस कर्ज स्वरूपात तारण मालमतेचा सरफायशी कायद्याअंतर्गत ताबा घेतला असल्याने व ठेवीदाराच्या हितासाठी तातडीने थकीत कर्ज वसुली करण्याकरिता सदर मालमतेचा लिलाव करणे पूर्वी इमारतीमधील व्यवहार हे भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ घ्या निर्देशानुसार सदर शाखेचा परवाना अबाधित ठेवून थांबवणे आवश्यक आहे .
त्यासाठी १ मार्च २०२१ पासून कोल्हापुर,सांगली,नेर्ले ता.वाळवा व मलकापूर(कराड) शाखांचे कामकाजाच्या अनुषंगाने सर्व ठेवीदारांना कळविणेत येते की आपल्या ५ लाखा पर्यंच्या ठेवी विमा योजने अंतर्गत सुरक्षित आहेत . बँकेचे कामकाज १ मार्च पासून रेसर्व्ह बॅककडील निर्देशानुसार शिराळा येथील बँकेच्या मुख्य शाखेतून कामकाज सुरू राहील.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments