शिराळा, ता.१३: काळामवाडी (ता.शिराळा) येथील जॅकवेल मध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी मालक तब्बल अडीच तास बैलासह पाण्यात पोहत राहिला.अखरे जे.सी.बी.आणून जीव वाचवण्याचा हा थरार अडीच तासाने संपुष्टात आला अन सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
बैलाला वाचवण्याचा थरार व्हिडीओ पहा
याबाबत समजलेली माहिती अशी,काळामवाडी येथील सखाराम पाटील आपल्या मुलासह बैलांना घेऊन गावच्या जॅकवेल जवळ घुण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी बैल धूत असताना रस्त्यावरील वाहनास बैल बुजून उडी मारल्याने तो जॅकवेल मध्ये पडला. त्यास जॅकवेलला पायऱ्या नसल्याने पाणी खोल असल्याने बैलास बाहेर काढणे अवघड झाले होते. बैल बुडू लागला. त्यामुळे त्यास वाचवण्यासाठी सखाराम यांचे चिरंजीव रुपेश याने जॅकवेल मध्ये उडी मारून बैलांसह पोहत त्याने बैलाचे तोंड वरती धरले. अडीच तास पाण्यात पोहत राहिलेत. त्यावेळी पणुंब्रे वारुण येथील नितीन ढेरे यांचा जेसीबी आणून बैलास सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थ व पाटील कुटूंबियांनी सुटकेचा श्वास सोडला.बैल जॅकवेल मध्ये पडल्याची घटना समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या बैलास बाहेर काढण्यासाठी किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे,उपसरपंच आनंदा सावंत, सतीश किनारे,संतोष पाटील, शामराव चव्हाण, प्रकाश सोंडुलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments