मराठी भाषा संवर्धन पंधरावाद्याच्या निमित्ताने
नाविण्यपूर्ण उपक्रम "श्यामची आई कथामालेचे ऑनलाईन अभिवाचन-सौ.वैजयंता गुरव. शिक्षिका जि. प.शाळा फुपेरे यांनी केले होते..
आजच्या या प्रसारमाध्यमांच्या युगात शालेय विद्यार्थी कुठेतरी भरकटताना दिसतात.शालेय विद्यार्थांचा वेळ मोबाईल, टी.व्ही वरील मालिका आणि सिनेमा पाहण्यात जातो त्यामुळे संस्काराची पायमल्ली होताना दिसते
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी " या उपक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार होण्यासाठी "संस्काराचे मोती " हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा फुफेरे शाळेतील शिक्षिका सौ. वैजयंता गुरव यांनी हाती घेतला होता.साने गुरुजी लिखित "श्यामची आई " या पुस्तकाचे त्यानी रोज सायंकाळी 7:30ते 8:30या वेळेत online अभिवाचन करत होत्या. व गुरव सर प्रास्ताविका मधून विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधत होते. 18 जानेवारी 2021 पासून या उपक्रमाचे आयोजन केले होते.रोजच्या कथेतून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी मिळत होती.या उपक्रमास विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला..
मराठी साहित्याची आवड निर्माण करणे ,वाचनसंस्कृती जोपासणे,संस्काराची शिदोरी साठवणे हे या उपक्रमामुळे साध्य झाले असल्याचे मत .
या उपक्रमाची सांगता करताना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीप कुमार कुडाळकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संस्काराची शिदोरी मिळाली आहे. तसेच यापुढेही गुरव मॅडम व गुरव सर यांनी असेच उपक्रम चालू ठेवावेत
यावेळी विद्यार्थी ,पालक व विषय साधनव्यक्ती श्री.मधुकर डवरी तसेच उपस्थित शिक्षकांनी आपले अभिप्राय व्यक्त केले. गुरव मॅडम व गुरव सर यांच्या उपक्रमासचे सर्वांनी भरभरून कौतुक केले .
शेवटी या उपक्रमामध्ये सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक, उपस्थित अधिकारी यांचे आभार श्री गुरव सर यांनी मानले
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments