शिराळा,ता.१७: भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील अर्जुन लक्ष्मण देसाई( वय ५३) व सौ. सुमन अर्जुन देसाई(४६) या पती पत्नीचा नातवासाठी मासे पकडायला गेले असता पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना आज सायंकाळी सहा वाजन्यपूर्वी घडली. याबाबत चुलत भाऊ सुभाष राजाराम देसाई यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली. घटनास्थळ व पोलिसातून समजलेली माहिती अशी, भाटशिरगाव गावा जवळ शिराळा-सागाव या मुख्य रस्त्या लागत पाझर तलाव आहे. त्या ठिकाणी अर्जुन देसाई वस्ती व शेती आहे. मुलगा दीपक हा ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला असल्याने चिखली येथे होता. अर्जुन यांनी दुपारी मक्याला पाणी लावले होते. त्यावेळी लाईट गेल्याने व नातू मासे मागत असल्याने सुन धनश्रीला शेतात ठेवून अर्जुन आपल्या पत्नी व नातवासह तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते.सुमन एका काठावर तर अर्जुन दुसऱ्या काठावर बसले होते. दरम्यान सुमन यांचा तोल गेल्याने त्या तलावात पडल्या.त्यांना वाचवण्यासाठी अर्जुन पोहत त्यांच्याकडे गेले असता सुमन यांनी त्यांना मिठी मारल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना तलाव जवळ खेळत असणाऱ्या पाच वर्षांच्या नातू साकेत याने पहिली. तिथून पळत जाऊन आईला आजी आजोबा पाण्यात बुडल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यावेळी तालावाच्या काठावर मोबाईल, व सुमन यांचे चप्पल आढळून आले. अर्जुन यांचा बटवा पाण्यात तरंगत होता.दुपारी कांदे येथील गोसावी समाज्याच्या लोकांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला पण आढळून आले नाहीत शेवटी चिलारी व दगड याच्या साह्याने रणजित देसाई, पिंटू अस्वले,शहाजी देसाई, सर्जेराव घोलप यांनी एकमेकांना मिठी मारलेले मृतदेह बाहेर काढले.त्यावेळी नातेवाईकांना केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चयात मुलगा,विवाहित मुलगी ,सून, नातवंडे असा परिवार आहे.पुढील तपास पोलीस हवालदार एस.एस.नलवडे करत आहेत.
सर्व देवांच्या आरत्या तोंडपाठ
अर्जुन यांच्या सर्व देवांच्या आरत्या तोंड पाठ होत्या. दसऱ्याच्या नवरात्रोत्सवात अर्जुन नऊ दिवस सकाळ संध्याकाळ सर्व आरत्या करत असल्याच्या त्यांच्या जाण्याने आठवणी लोकांच्यात जाग्या झाल्या.
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments