शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरून आपल्या शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली.
त्यानंतर त्यांनी गाडी च्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग आढळला नाही.त्यांनी त्यांचे सहकारी मित्र श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेश घोडे पाटील,बंधू राजेंद्र शिंदे यांना तात्काळ फोन करून बोलवून घेतले. यावेळी शेतात नागाचा शोध घेतला असता नाग सापडला नाही. यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय? ही शंका मनात आली असता तपासून बघितले असता नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनल मध्ये अगदी दिसू नये असा जाऊन बसला होता.यावेळी खूप प्रयत्न केल्या नंतर गाडीमधून या तरुणांनी नागाला बाहेर काढले व सुखरूपपणे त्याच्या अधिवासात सोडून दिले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments