शिराळा, ता.२२: .वेळ दुपारची.सर्वजण आप आपल्या पातचा ऊस भराभरा तोडण्याच्या नादात असताना वाद्यानं डाव साधला अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं. एक वर्षाच्या बाळावर बिबट्याने केलेल्या हल्याच्या या हृदयद्रावक घटनेने शिराळा तालुका सुन्न झाला. माझं बाळं ......हा मातेचा आकांत उपस्थितांचं हृदय हेलावून टाकणारा होता. रात्री साऱ्या खोपटवर स्मशान शांतता पसरली होती. टीचभर पोटाचा खळगा भरण्यासाठी आलेल्या ऊसतोडणी कुटुंबावर काळाचा घाला.
तडवळे (ता.शिराळा ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.सुफीयान शमशुद्दीन शेख (वय १ वर्ष) या ऊस तोडणी मजुराच्या बालकाचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.याबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शमशुद्दीन निजामुद्दीन शेख ( वय २७)(मूळगाव आनंदगाव ता.माजलगाव जि बीड ) हे आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णात शामराव पाटील या शेतकऱ्यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास निलगिरी झाडाखाली सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरनुम हिच्या सोबत ठेवले होते. सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून त्यास फरफट नेले. ते पाहून ती मुलगी ओरडल्याने सर्व ऊस तोडणाऱ्यांचे लक्ष तिकडे गेले.तो पर्यंत बिबट्या मुलास घेऊन उसात गेला.लोकांनी त्याचा पाठलाग केला असता मुलास उसात सोडून पळून गेला.
ही माहिती मिळताच घटनास्थळी शिराळाचे वनपाल चंद्रकांत देशमुख वनरक्षक , वनरक्षक हणमंत पाटील, बाबा गायकवाड, वनरक्षक देवकी ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मुलास जखमी अवस्थेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुध्द काकडे यांनी जाहीर केले. मुलाच्या मानेवर ११ व पोटावर ४ ठिकाणी अशा १५ ठिकाणी दातांच्या व नाख्यांच्या जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलवणार होता. याबाबत दस्तगीर मेहबूब शेख (रा.केसापुरी जि. बीड ) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी.वाडेकर करत आहेत.
या बिबट्याच्या या मुक्त वावारामुळे तडवळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार मानसिंगराव नाईक, उपवनसंरक्षक सांगली वनविभागाचे प्रमोद धानके,फिरते पथक वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनक्षेत्रपाल बाबुराव शिंदे यांनी भेट दिली.
साहेब बाळाचा जीव गेला आता तरी बिबट्याचा बंदोबस्त करा
तडवळे व परिसरात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अनेक कोंबड्या व कुत्र्यांचा जीव गेला आहे. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी वेळीवेळी मागणी केली पण त्याची दखल घेतली जात नाही. आता बाळाचा जीव गेला आतातरी बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी तडवळे ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक धानके यांच्याकडे केली.
त्या कुटुंबाला वन विभागामार्फत १५ लाखाची मदत देण्यात येणार असून त्या पैकी ५लाख तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे.उर्वरित १० लाखाची मदत ही दहा वर्षाची मुदत ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे.
उपवनसंरक्षक प्रमोद धानके
शिराळा येथे दफन
त्या चिमुकल्यास गावी बीड जिल्ह्यात जाऊन दफन करणे शक्य नसल्याने त्या शिराळा येथील दफनभूमी रात्री दहा नंतर दफन करण्यात आले
.
दोन पिंजरे लावले.
वनविभागाने सतर्कता म्हणून त्या परिसरात दोन सापळे लावले असून उद्या सकाळी त्या परिसरात कॅमरे लावण्यात येणार आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या विभागात गस्ती पथक सुरू केले आहे.
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments