शिराळा ,ता.१२: शिराळा शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी शिवणी येथे एक एकर जागा उपलब्ध झाली असून लवकरच शिराळा शहर सौर सिटी बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाअसल्याची माहिती नगराध्यक्षा सौ सुनीता निकम व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.
येथील व्यापारी सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शहरातील कचरा व्यवस्थापनसाठी जागा अपुरी होती. त्यामुळे या जागेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून शिवणी गावठाणातील एक एकर क्षेत्र कचरा व्यवस्थापन साठी उपलब्ध झाले आहे.
शहरात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार नेमनेसाठी ठराव करण्यात आला. महिला व बालकल्याण अंतर्गत ३ लाख रुपये मंजूर आहेत. त्यापैकी अंगणवाडी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व महिला दिनासाठी निधी खर्च करण्यात बरोबर.प्रदूषण विरहित वाहतुकीस प्रोसहान म्हणून शहरात चार ठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करण्यात येणार आहे.
बांधकाम विभाग कामांना मंजुरी देणे , शहराच्या वाढीव भागास पाणी वितरण व्यवस्था करणे , घनकचरा ठेकेदाराकडून नगरपंचयात मालकीच्या घंटा गाडीसाठी मासिक भाडे घेणे , महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान अंतर्गत निधी मंजूर करणे , बाजार भरविण्यासाठी सोयीची जागा उपलब्ध करून देणे विषयावर चर्चा करण्यात आली.
विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आमच्याही प्रभागात विकास निधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या निधी पैकी काही निधी देण्याची मागणी केली.
यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम , उपनगराध्यक्ष विजय दळवी , मुख्याधिकारी योगेश पाटील , नगरसेविका सुनंदा सोनटक्के , अर्चना शेटे , प्रतिभा पवार , सुजाता इंगवले ,नेहा सूर्यवंशी , आशाताई कांबळे, राजश्री यादव , सीमा कदम, नगरसेवक विश्वाप्रताप नाईक , संजय हिरवडेकर, , उत्तम डांगे , वैभव गायकवाड , मोहन जिरंगे उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments