शिराळा, ता.२६: शेती पंपाल रात्री ऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी तडवळे (ता.शिराळा) येथील ग्रामस्थांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, तडवळे येथे बिबट व इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढून मनुष्य व वन्य प्राण्यावर हल्ले होऊ लागले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी तडवळे येथे बिबट वन्यप्राण्यांचे हल्ल्यात ऊसतोड मजुराचा एक वर्षाचा मुलगा मृत झाला आहे .वन्यप्राणी हे साधारणता रात्रीचे वेळी आपले भक्ष्य शोधणेसाठी बाहेर पडत असतात .रात्री विद्युत पंपाल वीज दिली जात असल्याने जंगल क्षेत्राशेजारील वाडीवस्तीवरील शेतकरी आपले शेतास पाणी देणेसाठी रात्री अंधारात शेतात जात असतात.त्यामुळे शेतकरी , गावकरी व पशुधन यांचे जीवितास मोठ्या प्रमाणात धोका पोहचू शकतो . यासाठी तडवळे गावास विद्युत पंपासाठी केला जाणारा विद्युत पुरवठा रात्री न करता वेळापत्रकात बदल करून दिवसा करावा. त्यामुळे कोणत्याही मनुष्य व पशुधनाचे जीवितास धोका न पोहचता मनुष्य व वन्यजीव संघर्षाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल .
यावेळी सचिन पाटील,सुभाष पाटील,, कुंडलिक पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments