शिराळा, ता.४: बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा बँक परवाना रद्द करण्यात आलेला नाही. परंतु बँकेचे आर्थिक व्यवहार रिझर्व बँकेच्या अधीन राहून होणार आहेत. अशा पद्धतीचे दिशानिर्देश मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्या कडून पत्रकाद्वारे बँकेला कळविण्यात आलेले आहे अशी माहिती प्रशासक आदिनाथ दगडे यांनी दिली.
येथील सर्जेराव दादा नाईक सहकारी बँकेत झालेल्या बोगस कर्ज व्यवहार प्रकरणी प्रशासका कडून बँक प्रशासनाचा ताबा घेण्यात आलेला आहे. सध्या या बँकेतील सर्व व्यवहार संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त प्रशासकाच्या अधिपत्याखाली सुरू आहेत. २०११ साला पासून घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जासाठी नोटिसा बजावण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून काही प्रमाणात कर्जवसुली झालेली आहे.
बँके वरती नेमण्यात आलेल्या प्रशासका कडून काही प्रमाणात कर्जवसुली झालेली असली तरीही अद्यापर्यंत रिझर्व बँकेच्या धोरणानुसार बँकेचे प्रशासन हे रिझर्व बँकेच्या घालून दिलेल्या अटी नुसारच चालणार आहे. सध्या बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ अ च्या पोट कलम १ अन्वये देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा उपयोग करणे, बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ५६ सह भारतीय रिझर्व बँक निर्देशीत संदर्भात दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी बँक व्यवसाय बंद झाल्यापासून सर्जेरावदादा नाईक बँक शिराळा यांना निर्देश जारी करण्यात आले आहेत.
बँकेला कोणतेही कर्ज आणि ॲडव्हान्स नूतनीकरण करता येणार नाहीत, कोणतीही गुंतवणूक बँकेला परस्पर करता येणार नाही, पैसे उधार देण्यास, नवीन ठेवी स्वीकारण्यास, कोणतेही देयक वितरित किंवा करण्यास मंजुरी नाही, कोणत्याही तडजोडी मध्ये किंवा व्यवस्थेमध्ये प्रवेश आणि विक्री करीता हस्तांतरित करता येणार नाहीत, कोणतीही मालमत्ता विल्हेवाट लावण्यास सहमती असणार नाही, त्याचे उत्तरदायित्व आणि जबाबदाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बँकेला देण्यात आलेल्या नाहीत.
रिझर्व बँकेने दिशानिर्देश यांच्या मुद्द्यानुसार आरबीआय द्वारे बँकिंग परवाना सर्जेरावदादा नाईक बँकेचा रद्द करण्यात आलेल्या नाही. बँकिंग कार्य आगामी काळात सुरू ठेवले जाणार आहे. याशिवाय सर्व बँक बचत खाती, चालू खात्यावरील रक्कम पाचशेच्या वरती पैसे काढण्यास परवानगी मिळणार नाही. हा नियम ३ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार असल्याचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्या पत्रकाद्वारे काढण्यात आला आहे असे सांगितले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments