शिराळा (प्रतिनिधी) - 'गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज असून, ते देत शिक्षकांनी बालकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे आवश्यक आहे' असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात तालुका शिक्षक संघाच्या वतीने आयोजित 'कोविड योद्धा' पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात होते. जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे , तालुक्याच्या सभापती वैशाली माने, उपसभापती बी के नायकवडी, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले , 'कोरोना सारख्या जागतिक महामारीत आरोग्य आणि पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांनी काम केले आहे. कोविड काळातील उत्तम कामामुळे तमाम शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी नेहमीच शिक्षक चिंतामुक्त राहील याकडे लक्ष दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी राबविलेले बदली धोरण आणि शैक्षणिक ध्येयधोरणे आजही महत्वपूर्ण आहेत. शिराळा तालुक्यातील शिक्षक अनंत अडचणींना तोंड देत गुणवत्ता टिकवून आहे. तालुक्यातील शाळा आणि शिक्षक यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शिक्षक नेते थोरात म्हणाले, 'शिक्षकांना चिंतामुक्त करण्यासाठी शिक्षक संघ नेहमीच संघर्ष करत आहे. शिक्षण सेवकांचे प्रश्न असोत अथवा बदली धोरण असो प्रत्येक वेळी शिक्षक संघाने शिक्षक हिताची भूमिका घेतली आहे. आगामी काळात सुद्धा राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सहकार्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. शिंदे , ग्रामीण कथाकार बाबा परीट यांनी मनोगत व्यक्त केले. कोविड महामारी मध्ये तपासणी कक्ष, मदत कक्ष आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण इत्यादी कामे केल्याबद्दल तालुक्यातील सुमारे १८० प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांना 'कोविड योद्धा' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, कार्यकारी अध्यक्ष फत्तेसिंग पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष अशोक घागरे , सरचिटणीस मोहन पवार, प्रकाश जाधव, संजय पाटील, सी एम पाटील, अनंत सपकाळ, आर. सी. पाटील, प्रकाश यादव, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष पौर्णिमा पवार आदी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments