शिराळा, ता.९: अस्वलेवाडी (ता शिराळा ) येथील महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी आरोपी भगवान रंगराव वाघ व शंकर रंगराव वाघ( रा. अस्वलेवाडी) यांना एक वर्षाचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी २ हजार दंडाची शिक्षा शिराळा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. काळे यांनी सुनावली.
याबाबत समजलेली माहिती अशी,ही घटना अस्वलेवाडी येथे २०१८ साली घटना घडली होती. यातील आरोपी भगवान रंगराव वाघ व शंकर रंगराव वाघ यांनी आम्हाला मतदान का केले नाही म्हणून घरात घुसून पिडीत महिलेशी लज्जास्पद वर्तन केले होते. याबाबत त्यांच्या विरोधात शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.ज्योती संदीप पाटील यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवून युक्तीवाद केला होता. पोलीस हवालदार भिमराव यादव यांनी तपास कमी सहकार्य केले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments