शिराळा: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या समर्पण दिनानिमित्त शिराळा येथील कार्यालयामधे प्रतिमेचे पूजन प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सुखदेव पाटील |
शिराळा,ता.१२: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन संघटनेसाठी व राष्ट्रासाठी समर्पित केले असल्याने आज संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून गणला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या समर्पण दिनानिमित्त शिराळा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधे फोटो प्रतिमेचे पूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, भाजप पक्षाचे वटवृक्षामध्ये झालेल्या रूपांतराच्या पाठीमागे दीनदयाळ उपाध्याय यांच्या फार मोठा सिंहाचा वाटा आहे. संघटनेमध्ये अनेक लोक त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहेत .पंडितजी यांच्या समर्पित जीवनाचा आदर्श घेऊन संघटनेसाठी आजच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे.
सुखदेव पाटील म्हणाले, पंडित दीनदयाळ यांची धोरणे नेहमी गोरगरीब कष्टकरी व सामान्य जनतेच्या हिताची असल्यामुळे त्यांच्या विचारावर अनेक नेते मोठे झाले .त्यांच्या जीवन परिचय फार कमी लोकांना माहिती आहे. परंतु त्यांनी संघटनेसाठी केलेले काम हे उत्कृष्ट असल्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाने संपूर्ण देशामध्ये आपला विकासाचा ठसा उमटवणेचे काम केले आहे.
. यावेळी सह्याद्री सहकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबा पाटील, संजय कांबळे, जगनाथ चव्हाण, राजेंद्र बनसोडे उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments