शिराळा,ता.२२: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला छत्रपती संभाजी महाराज व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्याची मागणी प्रेस क्लब शिराळा यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याची आठवण येणाऱ्या पिढीला राहावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक किल्ले येतात. त्याची आठवण म्हणून या व्याघ्र प्रकल्पास छत्रपती संभाजी महाराज सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्यात यावे. पुणे बेंगलोर आशियायी महामार्गावर ती कराड जवळ असणाऱ्या पाचवड फाटा येथे चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे असा मोठा दिशादर्शक फलक व वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथे शिराळा भुईकोट किल्ला छत्रपती संभाजी स्मारक, चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याची माहिती देणारा दिशादर्शक फलक लावण्यात यावा. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष विकास शहा, सचिव शिवाजीराव चौगुले ,कार्यकारी सदस्य प्रीतम निकम, अजित महाजन, विठ्ठल नलवडे, सल्लागार निवृत्त माहिती अधिकारी हंबीराव देशमुख उपस्थित होते.
हे अवश्य वाचा👇
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments