BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात


  विटा:  विटा शहराला स्वच्छतेत देशात फाईव्ह स्टार शहर करण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक व नागरिकांनी आपली कंबर कसली असून शहरात  दिवसभर स्वच्छता महाश्रमदानातून शहर स्वच्छ व सुंदर केले जात आहे.

    या स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान मध्ये शहरातील सर्व व्यावसायिक असोशिएशन यांनी एकत्र येऊन विटा शहराला देशात सर्वाधिक स्वच्छ शहर करण्याचा निर्धार केला आहे. याप्रमाणे सर्व व्यावसायिक महिन्यातून दोन दिवस सातत्याने आपले दुकान व परिसर स्वच्छ करत आहेत.  सर्व व्यापारी व्यावसायिकांनी उत्फूर्तपणे सकाळी ७ पासूनच शहरात भव्यदिव्य स्वच्छतेचे पर्वच उभारले. आपला दुकान परिसर तर स्वच्छ केलाच परंतु शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शेकडो व्यापारी व विटेकर नागरिक झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. व्यावसायिकांनी आपआपल्या भागात स्वच्छतेच्या समित्या तयार केल्या आहेत. या समित्यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी या स्वच्छता महाश्रमदानाचे आयोजन केले. या महाश्रमदानात व्यावसायिकांनी आपल्या दुकान परिसराची स्वच्छता केली, झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर सुशोभित केला, काही व्यावसायिकांनी शहर स्वच्छतेचे फलक लावले, शहरात सर्वच भागात प्रत्येक दुकानांपुढे रांगोळी काढल्या.  व्यावसायिकांनी स्वच्छतेची जनजागृती व्हावी यासाठी आपल्या दुकानांपुढे डिजिटल स्क्रिन लावल्या आहेत. सर्व व्यावसायिक बांधवांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वसुंधरा शपथ घेत या स्वच्छता श्रमदान अभियानाची दिमाखदार सुरुवात केली.

   विटा नगरपरिषदेच्यावतीने शहर स्वच्छतेचे ब्रॕड ॲम्बीसिटर माजी नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्ष ॲड अजित गायकवाड, आरोग्य सभापती दहावीर शितोळे, माजी सभापती अविनाश चोथे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, नगरासेवक फिरोज तांबोळी यांच्यासह सर्वच नगरसेवकानी या श्रमदान मोहीमेत सहभागी होते. सर्व व्यावसायिकांचे गुलाब पुष्प व पारितोषिक देऊन कौतुक केले.

विटा शहरातील या महास्वच्छता श्रमदान मोहीमेत शहरातील कराड रोड, सांगली रोड, मायणी रोड, खानापूर रोड, चोंडेश्वरी चौक, पॉवरहाऊस रोड, उभी पेठ, सराफ पेठ व गणेश पेठ इत्यादी ठिकाणी मुख्याधिकारी अतुल पाटील व सर्वच नगरपरिषद पदाधिकारी व पालिका कर्मचारी यांनी भेटी देत सर्वांचे स्वागत करत अभिनंदन केले.

    यावेळी बोलताना ॲड वैभव पाटील म्हणाले, विटा शहराचा स्वच्छतेतून कायापालट करण्यासाठी शहरातील व्यावसायिक व नागरिकांचे श्रमदान अभिमानास्पद आहे. स्वच्छतेची लोकचळवळ असलेले  विटा शहर हे नाविण्यपूर्ण ठरले आहे कारण शहरात आज सर्व व्यावसायिक बांधवांनी एकमुखी निर्णय घेत संपूर्ण शहरात आज स्वच्छतेचे महाश्रमदान करत शहराला फाईव्ह स्टार करण्यासाठी विशेष योगदान दिले. शहरात स्वच्छतेची गुढी उभारत या स्वच्छतेच्या पर्वात व्यावसायिकांनी अतिशय कौतुकास्पद काम चालू केले आहे. संपूर्ण विटेकर या मोहीमेत सहभागी होवून ही लोकचळवळ यशस्वी ठरवत आहे हे अभिमानास्पद आहे.

   मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, विटेकर नागरिकांनी शहर स्वच्छतेत नेहमीच अग्रेसर योगदान दिले आहे. व्यावसायिकांनी आजचे हे श्रमदान करत नाविण्यपूर्णतेचा अविष्कार दिला आहे. शहरात उभारलेली स्वच्छतेची गुढी ही शहराला देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून देईल असा ठाम विश्वास आहे. 

   यावेळी शहरातील विविध भागात हे श्रमदान अभियान मोठ्या उत्साहात यशस्वी ठरले. उत्कृष्ट स्वच्छाग्रही दुकानांना पालिकेने पारितोषिके देत प्रोत्साहन दिले आहे. यावेळी सर्व व्यावसायिक विटेकर नागरिक पालिका पदाधिकारी, कर्मचारी, महिला युवक,  विद्यार्थी यांनी स्वच्छतेत सक्रियपणे योगदान दिले.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 




Post a Comment

0 Comments