शिराळा : भुईकोट किल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत शिराळकरांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात नगरपंचायतकडे पाठवा. असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
पहा प्रत्यक्ष काय झाली चर्चा
येथील तोरणा भुईकोट किल्ल्याचा राज्यशासन पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे. त्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार आमदार मानसिंगराव नाईक व आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी भुईकोट किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी बोलत होते. यावेळी किल्ल्याचे एकूण क्षेत्र, उपलब्ध जागा, तटबंदी, कोटेश्वर मंदिर, विहीर व त्यातील भुयारी मार्ग, पूर्वीच्या इमारतींचे भग्नाअवशेष व त्यांचे महत्व यांची पाहणी केली. यावेळी तटबंदी दुरुस्ती, छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, महाराजांना संगमेश्वरला अटक झाली. तेथून त्यांचा झालेला प्रवास. शिराळा येथे त्यांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी केलेला प्रयत्न याचे रेखाचित्र असलेले स्मारक, जवळच असलेलं शिवकालीन भवानीमाता मंदिराचा विकास व एकूणच पर्यटनदृष्ट्या आणखी जे कांही करणे शक्य आहे, त्या गोष्टीचां समावेश या विकासात असेल. ज्या इमारती उभारल्या जातील, त्या पुरातन धर्तीवर दगडाच्या असतील. जेणेकरून पर्यटकांना इतिहास काळातील अनुभूती येईल, असा प्रयत्न राहील, असे आमदार नाईक यांनी सांगितले. या वेळ त्यांच्या सोबत नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, युवा नेते विराज नाईक, नगरसेवक विश्वाप्रताप नाईक, मोहन जिरंगे, राजू निकम, बसवेश्वर शेटे, प्रमोद पवार, बांधकाम विभागाचे उप अभियंता अतुल केकरे , अभियंता दिनकर महिंद, राजू खुर्द, सनी आवटे, बाबा गायकवाड, उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments