कापुसखेड (ता. वाळवा) येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी इतर मान्यवर
नेर्ले : सर्वसामान्य जनतेला अपेक्षित विकास साधला जाईल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कापुसखेड (ता. वाळवा) ग्रामपंचायत प्रभाग तीन मध्ये वीस लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राजारामबापू पाटील बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, कोरोनामुळे विकास कामे खोळंबली होती. विस्कळीत जनजीवन हळू हळू पूर्व पदावर येत आहे. विकासाचा वेग वाढतो आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील व मी प्रयत्नशील आहे.
प्रारंभी सरपंच मंदाताई धुमाळे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. यावेळी जगन्नाथ पाटील यांचे घर ते वसंतराव पाटील शेड पर्यंत आर.सी.सी. गटर व रस्ता करणे हे ७.११ लाख रुपयांचे काम व शिवाजी पाटील-दुकानदार ते जुन्या पाण्याची टाकी रस्ता काँक्रीटीकरण करणे हे १३ लाख रुपयांचे कामाचा श्रीफळ फोडून व कुदळ मारून प्रारंभ झाला. कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील, अतुल पाटील, बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक जयसिंग पाटील, माजी प. स. सदस्य जयकर पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, राजेश पाटील, जगन्नाथ स्वामी, डी. के. पाटील, माणिक पाटील, भानुदास देसाई, पै. राजाराम माळी आदी उपस्थित होते. उपसरपंच बाबासो पाटील यांनी आभार मानले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments