शिराळा, ता.१८: व्यसनमुक्ती ही मानसिक, व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी गरजेची आहे. महिलांनीच खंबीर पाऊले उचलले तर कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचेल असे प्रतिपादन सखी मंचच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी केले.
आरळा (ता.शिराळा) येथे उमेद ग्रामसंघ , उमेद नारीशक्ती, जायंटस् ग्रुप आरळा यांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम व्यसनमुक्ती या विषयी बोलत होत्या. यावेळी सुकंन्या योजने अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ या बद्दल माहिती द
देऊन कोरोना योद्धा , आशा स्वयंसेविका, दोन मुली आसणा ऱ्या मातांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पाटील म्हणाल्या, कुटुंबाला नेस्तनाबूत करणारा घटक म्हणजे व्यसनाधीनता . आज या गोष्टींची जागृती आवश्यक आहे. समाज मनाला व व्यसनाधीन विळख्यात अडकलेल्या कृत्याला आपण बाहेर काढून जागृती करणे गरजेचे आहे . महिलांनी मनात आणले तर त्या स्वतः आपल्या पतीला अथवा मुलाला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढू शकतात. व्यसन एकाच व्यक्तीला उध्वस्त न करता पूर्ण कुटुंबाला उध्वस्त करते.व्यसनाला मिळत असलेली समाज मान्यता खूपच हानिकारक आहे.यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा च्या माध्यमातून आज व्यसनमुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
कार्यक्रमास उमेद ग्रामसंघ बचत गटातील महिला, जायंट्स ग्रुप ऑफ नारीशक्तीच्या अध्यक्षा निलोफर डांगे,वनरक्षक मनीषा धायपळे,अंगणवाडी सेविका अनुराधा देशपांडे, पद्मा भाकरे ,रेखा शिंदे उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments