शिराळा, ता.२: शिरसी (ता.शिराळा ) येथील येथील घाटकेवाडी येथे गवताच्या गंजीला अचानक आग लागल्यामूळे हजारो रूपयाचे नूकसान झाले आहे.
ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी,घाटकेवाडी येथे
दिपक तटले ,जगनाथ भोसले ,भगवान हसबनीस यांच्या गवताच्या गंज्या होत्या. त्यास अचानक आग लागली. या आगीत गावतासह शेणखताच्या गारी ही जाळल्या आहेत. ही घटना वस्तीत घडल्याने व आजूबाजूला घरे असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शिरसी येथील नागरिकांनी कुपनलिकेचे पाणी हात पंपाच्या सहाय्याने घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. विश्वास कारखाण्याची अग्निशमन गाडी ही बोलावण्यात आली होती. ग्रामस्थांच्या प्रयत्नातून आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा पंचनामा करून योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments